मंगळवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेन कसोटीत पराभूत केले. याबरोबरच ४ सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकत इतिहास रचला. गेल्या ३२ वर्षात ऑस्ट्रेलियान संघाला गॅबा स्टेडियमवर कोणी पराभूत केले नव्हते, पण तो कारनामा अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने करुन दाखवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचे गेल्या ३ वर्षात दुसऱ्यांदा त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत नमोहरण केले.
यानंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी भारतीय संघाचे जोरदार कौतुक केले. याबरोबरच त्यांनी मिश्किलीने म्हटले की भारतीयांना कधीही कमी समजू नये. त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेक भारतीयांना अभिमानाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या व्हिडिओची भूरळ पडली आहे.
फडणवीस यांनीही हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की ‘कधीही भारतीयांना कमी लेखू नका.’
Never ever, ever underestimate the Indians ! 🇮🇳 pic.twitter.com/ncsXfQoa00
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 19, 2021
या व्हिडिओमध्ये लँगर हे म्हणत आहेत की ‘पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवू की कोणत्याही गोष्टीला हलक्यात घ्यायचे नाही आणि दुसरी अशी की कधीही अगदी कधीही भारतीयांना कमी समजू नये. भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे आणि तुम्ही जर त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात आहात तर तुम्ही नक्कीच एक चांगले आणि मजबूत खेळाडू असाल.’
भारतीय संघाचे कौतुक –
याबरोबरच फडणवीस यांनी भारतीय संघाचे कौतुक करणारे आणि शुभेच्छा देणारे ट्विटही केले होेते. त्यांनी लिहिले होते की ‘ऐतिहासिक आणि स्वप्न पूर्ण झाले. भारतीय संघाचे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकल्याबद्दल अभिनंदन. कर्णधार अजिंक्य राहणेचेही कौतुक. १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाचा गॅबावर पहिला पराभव. आपल्यासाठी एक खास क्षण.’
Historic and a dream come true!
Congratulations India & #TeamIndia for retaining #BorderGavaskarTrophy !
Well done captain @ajinkyarahane88 !
First test defeat for Australia by Team India at Gabba since 1988.
Special moment for all of us!#INDvsAUS #IndiaWins— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 19, 2021
भारतीय संघाचे कौतुक करणारे फडणवीस पहिलेच राजकारणी नाही, तर त्यांच्याबरोबरच अनेक राजकारणी नेत्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी भारतीय संघाबद्दल ट्विट करताना लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कटता सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प होता. संघाचे अभिनंदन! आपल्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’
We are all overjoyed at the success of the Indian Cricket Team in Australia. Their remarkable energy and passion was visible throughout. So was their stellar intent, remarkable grit and determination. Congratulations to the team! Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2021
तसेच आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही भारतीय संघाच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी ट्विट केले. त्यांनी ट्विट करतांना लिहले की, “ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चितचं ऐतिहासिक आहे. ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर गाबा येथे विजय मिळवला. वेल डन.”
Congratulations #TeamIndia for this fabulous victory!
Historic moment for Indian cricket as India beat the Australians in Test Cricket at the Gabba, Brisbane after 32 years. Well done! #IndiavsAustralia— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 19, 2021
ब्रिस्बेन कसोटी विजय –
ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बीसीसीआयला खुले पत्र, ‘या’ कारणासाठी मानले आभार
ऑस्ट्रेलियाला त्याच्याच देशात सर्वाधिकवेळा पराभूत करणारे ३ भारतीय कर्णधार
“ब्रिस्बेन कसोटी सामन्यावर चित्रपट बनवा”, या बॉलिवूड अभिनेत्याने केली मागणी