भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू देविका वैद्य हिने शुक्रवारी म्हणजेच 12 मे रोजी आपला साखरपुडा उरकला. यावेळी भारताच्या महिला संघातील अनेक खेळाडूं उपस्थिती होत्या. स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांचा सुंदर अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून जेमिमाने कार्यक्रमातील फोटो सोशल शेअर केले आहेत. स्मृती मंधानाने नायरा कट ड्रेस घातला असून, जेमिमाने अतिशय सुंदर पांढरा ड्रेस परिधान केला आहे. जेमिमाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये देविका आणि तिचा होणारा पती मेघन बेलसरे दिसत आहेत. सोबतच स्मृती मंधानाही दिसत आहे.
पुण्याची रहिवासी असलेली देविका वैद्य महिला क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावते. 2014 मध्ये तिचे टीम इंडियामध्ये पदार्पण झाले त्यावेळी साउथ आफ्रिकेसोबत तिचा पहिला सामना खेळला गेला. मात्र, त्यानंतर तिला 8 वर्षे खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, गेल्या वर्षी ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात परतली. तसेच, देविका डाव्या हाताने फलंदाजी करते आणि लेगब्रेक गोलंदाजी मध्येही तिचे विशेष प्राविण्य आहे. ती भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट खेळली आहे.
आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द
विशेष म्हणजे देविकाने भारतीय संघासाठी 9 एकदिवसीय सामन्यांच्या 7 डावात 28.02 च्या सरासरीने 169 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 6 विकेट्सही घेतल्या आहेत. तर टी-20 मध्ये तिने 13 सामन्यांच्या 7 डावात 22.02 च्या सरासरीने 89 धावा केल्या आहेत. देविकाचे क्रिकेट करिअर अध्याप गाजलेले नाही मात्र आगामी काळात तिला अनेक संधी मिळतील, असे मानले जात आहे. (Devika Vaidya got engaged and Smriti Mandhana and Jemima Rodrigues were present.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या सामन्यात दिसणार गुजरात टायटन्सचा नवीन लूक! अशी आहे हार्दिकच्या संघाची नवीन जर्सी
कर्णधार कृणाल पंड्याची जादू! लागोपाठ चेंडूंवर घेतल्या दोन मोठ्या विकेट्स