अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता. कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी२० डावात सूर्यकुमार यादवने देखील अर्धशतक झळकावले आहे. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १८५ धावांपर्यंत मजल मारली. तसेच हा सामना ८ धावांची जिंकला. या सामन्यानंतर सुर्यकुमारच्या पत्नीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला.
आयपीएल कारकिर्दीत १०० सामन्यांचा टप्पा ओलांडणाऱ्या सूर्यकुमार यादवला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजी करण्याची मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतक झळकावले. या खेळीनंतर सर्वत्रच त्याचे कौतुक केले जाते आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. तसेच त्याची पत्नी देविशानेही त्याचा एक खास मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव चौथ्या सामन्यातील हायलाईट पाहताना दिसून येत आहे. त्यावर त्याची पत्नी विचारत आहे की,”काय करत आहे?” यावर सूर्यकुमार यादव उत्तर देत म्हणतो की, “फलंदाजी करत असताना खेळलेले शॉट पाहत आहे.” या उत्तरानंतर देविशा म्हणते,” सूर्या प्रत्येक सामन्यानंतर हायलाईट पाहतो, तू खरंच मूर्ख आहेस.” या व्हिडिओवर चाहत्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
https://www.instagram.com/p/CMlP9vvjMu9/
तसेच देविशाने सुर्यकुमारचा सामनावीर पुरस्कारासोबत असलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CMkzwL1pp_B/
सुर्यकुमारने या सामन्यात ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तो १४ व्या षटकात तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराची एमकमेकांना धक्काबुक्की, व्हिडिओ होतोय व्हायरल
पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यासाठी ‘असा’ असेल भारताचा संभाव्य संघ
नवी जोडी! यॉर्करकिंग बुमराह आणि संजनाचे रिसेप्शनमधील फोटो व्हायरल, चाहत्यांकडून मिळतंय भरभरून प्रेम






