---Advertisement---

नवी जोडी! यॉर्करकिंग बुमराह आणि संजनाचे रिसेप्शनमधील फोटो व्हायरल, चाहत्यांकडून मिळतंय भरभरून प्रेम

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 7:26 PM
---Advertisement---

भारतीय संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांच्या विवाहाबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर १५ मार्च रोजी गोव्यामध्ये त्यांनी विवाह करत या चर्चांना पूर्णविराम दिला. विवाह झाल्यानंतर बुमराहने आणि संजनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली होती. नुकतेच या नवविवाहित जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या रिसेप्शनचे काही फोटोज् शेअर केले आहे. ज्यांना चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

बुमराह आणि संजना यांचा विवाह सोहळा १५ मार्च २०२१ रोजी पार पडला होता. या सोहळ्यात मोजक्याच लोकांना आमंत्रित केले गेले होते. तसेच या सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या मंडळींवर मोबाईल वापरण्यास निर्बंध लावण्यात आले होते. विवाह झाल्यानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर फोटोज् शेअर करत अधिकृतरित्या जाहीर केले होते. त्यांनी लिहिले होते की,” प्रेमाने प्रेरित होऊन आम्ही सोबत मिळून नवीन प्रवास सुरू केला आहे. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे.”

संजना आणि बुमराहने शेअर केले रिसेप्शन सोहळ्याचे फोटो

यापूर्वी बुमराह आणि संजना यांच्या संगीत, हळद आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता या दोघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. बुमराहने २ फोटो शेअर केले आहेत आणि कॅपशनमध्ये लिहिले आहे की, “गेले काही दिवस जादूई होते. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छाबद्दल सर्वांचे आभारी आहोत.”

तसेच या फोटोंमध्ये दिसते की रिसेप्शनमध्ये जसप्रीत बुमराहने काळया रंगाचा सूट परिधान केला होता. तसेच संजना गणेशन हिने रिसेप्शनच्या निमित्ताने जांभळा रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच संजनाने देखील २ फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तिने लिहिले, “गेल्या काही दिवसांपासून आम्ही तुमच्या प्रेमामुळे भारावून गेलो आहोत. आम्ही मोठ्या आनंदाने आपले संदेश आणि शुभेच्छा वाचत होतो. धन्यवाद.”

आयपीएलमधून बुमराह करु शकतो क्रिकेटमध्ये पुनरागमन

बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या अगामी वनडे मालिकेसाठीही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तो इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामात खेळतानाच चाहत्यांना दिसू शकतो. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“दिवाळीत फटाके उडवू नका, लग्नासाठी ते राखून ठेवा!” रिसेप्शनच्या फोटोंवरून बुमराह होतोय ट्रोल

सुर्यकुमारने अर्धशतक पूर्ण करताच भारताच्या ड्रेसिंग रुममधून ‘असे’ झाले कौतुक, पाहा व्हिडिओ

“टीम सिलेक्शनसाठी वय नाही तर, ‘हा’ असावा मुख्य निकष”, सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---