न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज, डेवोन कॉनवे हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. तसेच भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील त्याने आपली जोरदार कमिगिरी सुरू ठेवली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर, न्यूझीलंड संघाकडून डेवोन कॉनवेने अर्धशतकी खेळी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
असा कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज
डेवोन कॉनवेने टॉम लेथमसोबत डावाची सुरुवात केली होती. या दोघांनी मिळून न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. ३४ षटकापर्यंत भारतीय संघाला न्यूझीलंडचा एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. त्यानंतर ३४ व्या षटकात भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने लेथमला बाद करत माघारी धाडले होते.
पण ते कॉनेवे नावाचे वादळ लवकर थांबवू शकले नाहीत. त्याने आपली लय कायम राखत १५३ चेंडूत ५४ धावांची तूफानी खेळी केली. यात त्याने ६ चौकार लगावले होते. या खेळीसह तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताच्या ११ खेळाडूंपैकी एकालाही अर्धशतकापर्यंत पोहोचता आले नाही. (Devon Convey becomes the First batsman to score half century in WTC final)
तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघाची धावसंख्या २ बाद १०१ आहे. यामध्ये केन विलियमसन १२ धावांवर नाबाद आहे. तर रॉस टेलरला खाते देखील उघडता आले नाहीये.
भारतीय संघांचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. मात्र तो अर्धशतकापर्यंत मजल मारू शकला नाही. तर कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. यासोबतच रोहित शर्माने ३४ आणि शुबमन गिलने २८ धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ३१ धावा देत ५ गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट आणि निल वॅगनर यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाची तिशी ओलांडूनही एका युवकाप्रमाणे न्यूझीलंडचा यष्टीरक्षक करतोय यष्टीरक्षण, एकदा बघाच
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी काळात भारतात रंगू शकतात ‘या’ तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा
लाईव्ह सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘काय रे, ओरडतोय की विचारतोय’