---Advertisement---

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

On: शनिवार, जून 12, 2021 9:39 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २९ वर्षीय कॉनवे सातत्याने धावा करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावणाऱ्या कॉनवेने दुसर्‍या कसोटीतही शानदार ८० धावांची खेळी केली.

कॉनवेने आतापर्यंत तीन डावात १०१ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याची न्यूझीलंडची योजना यशस्वी झाली. सर्व गोलंदाजांना सराव करण्याची संधी मिळाली. दुसरीकडे कॉनवेची कसोटी खेळण्याची क्षमतादेखील समोर आली आहे. कॉनवेच्या येण्याने न्यूझीलंडची सलामीवीरची समस्याही सुटल्याचे दिसून येत आहे.

कॉनवेमध्ये हसीची झलक
डावखुरा फलंदाज असलेल्या डेवॉन कॉनवेने ऑस्ट्रेलियन खेळाडू माइक हसीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात उशिराने केली. उशीरा संधी मिळाली तरीही ते येताच प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरले. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये टी२० मध्ये पदार्पण करणाऱ्या कॉनवेने न्यूझीलंडकडून १४ सामन्यांत ५९.१२ च्या सरासरीने ४७३ धावा केल्या आहेत.

टी२० मध्ये त्याच्या स्फोटक कामगिरीनंतर या वर्षी मार्च महिन्यात त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळाली. या फलंदाजाने आतापर्यंत तीन वनडे सामन्यांमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह ७५ च्या सरासरीने २२५ धावा जमवल्या आहेत.

भारतीय गोलंदाजांचा करावा लागेल सामना
कॉनवेने कसोटीमध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या तीन डावांमध्ये ५५४ चेंडूंचा सामना केला आहे. यामध्ये इंग्लंडचे गोलंदाज त्याला केवळ दोन वेळा बाद करू शकले. या फलंदाजाने जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड आणि ऑली स्टोन सारख्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांच्या घरच्या मैदानावर धावा केल्या आहेत.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यासारखे सक्षम गोलंदाज भारताकडे आहेत. मात्र, रविचंद्रन अश्विन हा भारतासाठी ‘ट्रम्प कार्ड’ सिद्ध होऊ शकतो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अश्विन हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने डाव्या हाताच्या फलंदाजांना २०० पेक्षा जास्त वेळा बाद केले आहे. अश्या परिस्थितीत विराट कोहली अश्विनवर अवलंबून राहू शकतो. सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा गोलंदाज असलेला अश्विन या महत्त्वपूर्ण सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघ खेळतोय आपापसात सराव सामना, पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंनी दाखवली चमक

व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव

चूकीला माफी नाही! भर सामन्यात पंचांशी पंगा आणि स्टंप उखडणे आले शाकिबच्या अंगाशी, झाली ‘मोठी’ कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---