---Advertisement---

‘बेबी एबी’चा कहर! १९ वर्षांखालील विश्वचषकात ५०० हून अधिक धावा चोपत मोडला शिखरचा १८ वर्षे जुना विश्वविक्रम

Dewald- Brevis
---Advertisement---

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धा अखेरच्या टप्प्या आली आहे. या स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात ७ व्या क्रमांकासाठी प्लेऑफ सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २ विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा नायक ठरला तो डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis). त्याने या सामन्यात शतकी खेळी करण्याबरोबर मोठा विश्वविक्रमही केला. 

ब्रेव्हिसने शिखरचा विश्वविक्रम मोडला
‘बेबी एबी’ नावानो ओळखल्या जाणाऱ्या ब्रेव्हिसने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धा गाजवली आहे. तो या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये खेळताना दिसला. त्याने गुरुवारी देखील बांगलादेशविरुद्ध १३० चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३८ धावांची शतकी खेळी केली. यासह त्याने या स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा पार केला.

त्याने या स्पर्धेत ६ सामन्यांत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याने शिखर धवनचा १८ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम केवळ एका धावेने मोडला आहे. ब्रेव्हिस आता एका १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (highest run getter in a single U19 World Cup)

यापूर्वी हा विक्रम भारताच्या शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर होता. शिखरने २००४ साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ७ सामन्यांत ८४.१६ च्या सरासरीने ३ शतके आणि १ अर्धशतकासह ५०५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

विशेष म्हणजे १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या एका स्पर्धेत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम शिखर आणि ब्रेव्हिस या दोघांव्यतिरिक्त आजपर्यंत कोणीही केलेला नाही.

एका १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
५०६ – डेवाल्ड ब्रेव्हिस, २०२२
५०५ – शिखर धवन, २००४
४७१ – ब्रेट विल्यम्स, १९८८
४२३ – कॅमेरॉन व्हाईट, २००२
४२१ – डेनोवन पागो, २००२

दक्षिण आफ्रिकेचा विजय
गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २९३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून अरिफुल इस्लामने १०२ धावांची शतकी खेळी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून क्वेना मफाकाने  सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर २९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने ब्रेव्हिसच्या शतकाच्या जोरावर २ विकेट्सने विजय मिळवला आणि ७ व्या क्रमांकासह आपले या स्पर्धेतील अभियान संपवले. दक्षिण आफ्रिकेने ४८.५ षटकांत ८ बाद २९८ धावांसह हा सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचं आहे..” युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर काय होती प्रतिक्रिया? शार्दुल ठाकूरचा खुलासा

मोईन अलीच्या पोराने ४१ वर्षीय आफ्रिदीला धू धू धुतला! एकाच षटकात ठोकले ३ षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---