---Advertisement---

‘बर्थडे बॉय’ युजवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्री वर्माची खास पोस्ट; म्हणाली, “मी तुझी चीअरलीडर अन् तू…” ‘

On: मंगळवार, जुलै 23, 2024 10:36 PM
Yuzvendra Chahal and Dhanshree
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू ‌युजवेंद्र चहल याने 23 जुलै रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा वाढदिवस खास राहिला. त्याचबरोबर त्याची पत्नी धनश्री हिने एक स्पेशल पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

चहलच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातील चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संघ सहकाऱ्यांनीही त्याचा वाढदिवस खास बनवला. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्री हिने या वाढदिवसाच्या अतिशय वेगळ्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी तिने पाच छायाचित्रे देखील सोशल मीडियावर पोस्ट केली‌. त्याला कॅप्शन देताना तिने लिहिले, ‘दिग्गज फिरकीपटू आणि विजेता. तु कौशल्य आणि संघाला विजयी बनवण्याची जिद्द या दोन गोष्टी घेऊन येतो. देव तुझ्यावर नेहमी आशीर्वादांचा वर्षाव करो. नेहमी तुझी सर्वात मोठी चिअर लीडर.’ यासोबतच तिने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला. या पोस्टखाली चाहत्यांच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या जोडीला नजर लागू नये, असे देखील म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

क्रिकेटपटू होण्याआधी चहल याने बुद्धिबळ खेळात नाव कमावले होते. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये देखील यश मिळवले. त्याने भारतीय संघासाठी 2016 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याची कुलदीप यादवसह खास जोडी जमली. या फिरकी जोडीने जगभरातील सर्व मैदानांवर उत्कृष्ट कामगिरी केली. चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी 80 टी20 सामन्यात 96 बळी मिळवले आहेत. असे असले तरी त्याची भारतीय टी20 संघातील जागा निश्चित नाही. सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात जागा बनवण्यात तो अपयशी ठरला.‌ आगामी देशांतर्गत हंगामात उत्कृष्ट कामगिरी करून तो भारतीय संघात पुनरागमानाचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या-

“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव
आयसीसीचा युएसए संघावर कारवाईचा बडगा, 12 महिन्यांसाठी टीमला केले निलंबित; कारण काय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---