ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील श्रीलंका संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंका संघाने शनिवारी (5 नोव्हेंबर ) इंग्लंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला. मात्र, त्याचवेळी क्रिकेटजगताला हादरवून सोडणारी एक बातमी समोर येत आहे. श्रीलंका संघाचा अनुभवी फलंदाज धनुष्का गुणतिलका याला पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
शनिवारी रात्री श्रीलंका संघ मायदेशी परतण्यासाठी सिडनी येथून उड्डाण करणार होता. मात्र, तत्पूर्वी सिडनी पोलिसांनी गुणतिलका याला अटक केली. एका महिलेने लावलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर त्याला ही अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 2019 मध्ये देखील अशाच एका प्रकरणात गुणतिलका याचा समावेश असल्याच्या कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
गुणतिलका हा या विश्वचषकासाठी मुख्य संघाचा भाग होता. मात्र, पात्रता फेरी दरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी अशेन बंडारा याचा संघात समावेश करण्यात आला होता. गुणतिलका याने श्रीलंकेचे नेतृत्व देखील काही काळ केले होते. त्याने आतापर्यंत श्रीलंकेसाठी 8 कसोटी, 47 वनडे व 45 टी20 सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलियाची एक्झिट होताच मॅक्सवेलची आपल्याच संघाविरुद्ध तिखट प्रतिक्रिया; म्हणाला…
पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेचा जोश भलताच वाढलाय; कॅप्टन म्हणाला, ‘विराटला आऊट करण्याची…’