धवल कुलकर्णी भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. गुरुवारी (14 मार्च) त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या आणि मुंबईला रणजी ट्रॉफी मिळवून दिली. कर्णधार अजिंक्य रहाणे यानेच शेवटच्या विकेटपूर्वी कुलकर्णीच्या हातात चेंडू दिला होता. उमेश यादव याच्या रुपात त्याने विदर्भची शेवटची विकेट घेतली आणि मुंबईला 169 धावांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर धवल कुलकर्णी याची प्रतिक्रिया चर्चेत आहे.
धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) याने 2008 साली प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तसेच 2014 मध्ये भारतासाठी पहिला वनडे सामना खेळला. 2014 ते 2016 यादरम्यान त्याने भारतासाठी 12 वनडे, तर 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 19, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 विकेट्स घेतल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 95 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 281 विकेट्स घेतल्या. लीस्ट ए क्रिकेटमध्ये 130 सामन्यात 223, तर टी-20 फॉरमॅटमध्ये 162 सामन्यांमध्ये 154 विकेट्स नावावर केल्या. असे असले तरी, निवृत्तीच्या भाषणात वेगवान गोलंदाजाने देशासाठी जास्त क्रिकेट खेळता आले नाही, हे बोलून दाखवले.
धवल कुलकर्णीला वाटते की तो भारतीय संघासाठी अजून सामने खेळी शकत होता. पण याची खंत तो मनात बाळगून नाही. वेगवान गोलंदाज याविषयी म्हणाला, “जे झाले, ते झाले. आता मी मागे पाहण्यापेक्षा भविष्याचा विचार करत आहे. मला वाटते भारतीय संघासाठी मी अजून क्रिकेट खेळले पाहिजे होते. पण आता ते होऊन गेले आहे आणि मला कुठलाच पच्छाताप नाही. यासाठी मी कुणाकडे बोट देखील दाखवले नाहीये. मी असाच आहे. नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. या गोष्टी आव्हान म्हणून घेत असतो.”
वेगवान गोलंदाज क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण क्रिकेट खेळून त्याचे मन भरले नाहीये. भविष्यात देखील तो क्रिकेटशी निगडित काहीतरी करताना दिसू शकतो. कुलकर्णी म्हणाला, “मी अजून जास्त विचार केला नाहीये. पण क्रिकेटने मला खुपकाही दिले आहे. मलाही या खेळाला खूपकाही परत करायचे आहे. मला माहीत नाही की मी कोचिंग करणार आहे की, अजून काही. पण क्रिकेट माझ्या आजूबाजूला असेल.” (Dhav Kulkarni’s big statement after retirement)
महत्वाच्या बातम्या –
नंदुरबार संघाचा विजयी चौकार, तर सांगली, कोल्हापूर, पालघर संघाचा तिसरा विजय
पंतचा सराव पाहून दिल्ली कॅपिटल्सचे कोच खुश! फॉर्म पाहून काय म्हणाले वाचाच । IPL 2024