चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या आगामी हंगामाबाबत मोठे संकेत दिले आहे. त्याने फक्त त्याच्या फिटनेसबद्दल सांगितले नाही तर त्याने हे देखील सांगितले की, त्याने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आयपीएलमधून नाही. याचाच अर्थ धोनी पुढील आयपीएल हंगामातही खेळताना दिसणार आहे.
एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) याला आयपीएल 2023 मध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती पण तरीही त्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपद मिळवून दिले. आयपीएल संपल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली जी यशस्वी झाली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा अँकरने त्याला विचारले की,तुम्ही निवृत्ती घेतली आहे?, तेव्हा धोनीने उत्तर दिले, धोनी म्हणाला, “मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही. सीएसकेचे चाहतेही येथे आहेत. गुडघ्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता पुनरागमन सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत बरे वाटेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु, मला दैनंदिन कामात कोणतीही अडचण येत नाही.”
Thala Dhoni provides update on playing IPL 2024 and his knee surgery! ????????????@MSDhoni #MSDhoni #WhistlePodu pic.twitter.com/Nffu5Co2f1
— DHONI Era™ ???? (@TheDhoniEra) October 26, 2023
एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 मध्ये सीएसकेला पाचव्यांदा चँम्पियन बनवले आणि म्हणूनच चाहत्यांची एमएस धोनीने पुढील आयपीएल हंगामातही खेळावे अशी इच्छा आहे. आता धोनीने केलेल्या वक्तव्यावरून तो आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसणार असल्याचे दिसते.
धोनीने आपल्या कारकिर्दीत खूप मोठे यश प्राप्त करून भारतीय संघाला नव्या उंचीवर नेले आहे. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2007, वनडे विश्वचषक 2011आणि चँम्पियन ट्राॅफी 2013 अशा तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. (Dhoni big statement on fitness I only want to play in international cricket)
महत्वाच्या बातम्या





