चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला क्रिकेट तज्ञ पॅनलने इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १२ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ कर्णधार निवडले आहे. या क्रिकेट तज्ञ पॅनेलमध्ये आशिष नेहरा, संजय मांजरेकर, डॅरेन गंगा, स्कॉट स्टायरिश, माइक हेसन, डीन जोन्स, रसेल अर्नोल्ड, सायमन डोल आणि ग्रॅमी स्मिथ यांचा समावेश होता.
२००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये धोनीने १० हंगाम चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व केले आहे. २ हंगामात सीएसकेला निलंबित केल्यामुळे त्यांना २ वर्षे आयपीएलपासून दूर रहावे लागले होते.
या १० हंगामात कर्णधार धोनीने (MS Dhoni) ८ वेळा सीएसकेला अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. ज्यातील ३ अंतिम सामन्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे धोनीच्या विजयाची सरासरी ६०.११ आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माच्या (Roit Sharma) नेतृत्वाखाली ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. परंतु, धोनीची विजयी सरासरी रोहितच्या तुलनेत जास्त असल्याने सर्वोत्कृष्ठ कर्णधाराचा मान धोनीने पटकावला.
रोहित शिवाय सर्वोत्कृष्ठ कर्णधारांच्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) २ वेळा विजय मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीर आहे. तसेच राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पहिल्या आयपीएल हंगामात विजय मिळवून देणारा कर्णधार शेन वॉर्नचा (Shane Warne) देखील समावेश आहे.
२००९मध्ये विजय प्राप्त करणारा डेक्कन चार्जर्सचा कर्णधार एॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि २०१६मध्ये सनराइजर्स हैद्राबादला (Sunrisers Hyderabad) विजय मिळवून देणारा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचा समावेश होता.
धोनीचा माजी संघसहकारी नेहरा स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, “सर्वोत्कृष्ट कर्णधारासाठी माझी निवड धोनीच होता. त्याच्या नेतृत्वाखाली मी सर्वाधिक सामने खेळले आहेत. मग ते राष्ट्रीय संघाकडून असो किंवा आयपीएल संघाकडून. मी रोहितच्या नेतृत्वाखाली एकदाही खेळलो नाही. त्यामुळे माझी निवड धोनी असणे साहजिक होते.”
३९ वर्षीय धोनीला आयपीएलमधील सर्वात दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जाते. धोनीने १९० सामन्यात ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने यष्टीमागे ९८ झेल आणि ३८ यष्टीचीत यांसह १३६ फलंदाजांना बाद केले आहे.
धोनीने जुलै २०१९मध्ये शेवटचा सामना खेळला होता. आयपीएल२०२० मध्ये धोनीला खेळताना दिसणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?
-या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस
-केवळ २ वेळा कसोटीत फिरकीपटूंनी टाकल्या होत्या पहिल्या २ ओव्हर






