ब्रिस्टल। रविवारी 8 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा आणि निर्णायक सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिकाही जिंकली.
या बरोबरच हा सामना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठीही खास ठरला. त्याने या सामन्यात 3 विश्वविक्रम केले आहेत.
धोनीने या सामन्यात 5 झेल आणि एक धावबाद केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका सामन्यात 5 झेल घेणारा धोनी पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे.
50 झेल घेणारा एकमेव यष्टीरक्षक:
500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा धोनी रविवारी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यष्टीमागे 50 झेल घेणारा पहिला यष्टीरक्षक ठरला. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला या सामन्यात 1 झेल घेण्याची आवश्यकता होती.
त्याने या सामन्यात 5 झेल घेतल्यामुळे आता त्याचे 93 टी20 सामन्यात 54 झेल झाले आहेत. त्याचबरोबर धोनी हा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणाराही यष्टीरक्षक आहे.
त्याने 33 यष्टीचीत केल्या आहेत. त्यामुळे त्याने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये यष्टीमागे सर्वाधिक 87 विकेट घेतल्या आहेत.
ट्वेंटी20मध्येही 150 झेल:
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यष्टीमागे 50 पेक्षा जास्त झेल घेण्याचा टप्पा पार करण्याबरोबरच धोनीने ट्वेंटी20मध्येही यष्टीरक्षक म्हणून150 झेल घेण्याचा टप्पा पार केला आहे.
त्याचबरोबर ट्वेंटी20मध्येही यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय!
-भारताने मालिका तर जिंकली पण हे ५ विक्रमही केले
-वाढदिवस विशेष- दुसरा गांगुली होणे नाही