fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

म्हणून एमएस धोनी झाला भावुक

या आठवड्यात ७ एप्रिलपासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होत आहे. यावर्षी आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स असा रंगेल. या सामन्यातून दोन वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल मध्ये पुनरागमन करणार आहे. याबद्दल ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी भावूक झाला होता.

‘आम्ही परत येत आहोत, ते पण एक संघ म्हणून’ असा संदेश देणारा धोनीचा व्हिडीअो ट्विटरवर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये तो थोडा थोडा थांबून बोलत होता.

त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे की, ” प्रत्येक परिस्थितीतून जाताना चेहऱ्यावर हसू ठेवणे महत्वाचे असते. पण आता पुढे काय हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. आम्ही परत आलो आहोत, ते पण एक संघ म्हणून. तसेच प्रयोजकांचे खूप आभार.”

चेन्नई संघ आयपीएलमधीय एक यशस्वी संघापैकी एक आहे. धोनी या संघातून २००८ च्या पहिल्या मोसमपासून खेळत आहे. मात्र मागील दोन वर्ष स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणामुळे चेन्नई संघाला निलंबित केले होते. त्यामुळे धोनी मागील दोन वर्ष रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळाला.

पण आता दोन वर्षांची बंदी संपल्यानंतर चेन्नई आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्यांनी धोनीला आपल्या संघात कायम ठेवले आहे आणि पुन्हा एकदा त्याच्याकडेच कर्णधारपदाची धुरा दिली आहे. त्याचबरोबर सुरेश रैना आणि रवींद्र जडेजालाही चेन्नईने संघात लिलावाआधी कायम केले आहे.

चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली २०१० आणि २०११ असे सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच या संघाने २००८ ते २०१५ या कालावधीत ६ वेळा आयपीएलची अंतिम फेरीही गाठली आहे.

You might also like