---Advertisement---

अश्विनकडून धोनीची सिने दिग्दर्शकाशी तुलना, वनडे वर्ल्डकपपूर्वी फिरकीपटूने सांगितली खासियत

Ravichandran Ashwin
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी दिग्गज एमएस धोनी आणि रविचंद्रन अश्विन यांची जोडी मैदानात नेहमीच चर्चेत राहिली. भारतीय संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी दोघांनी अनेक सामने एकत्र खेळले. एमएस धोनीला आपल्या अप्रतिम नेतृत्वासाठी ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्याआधी बुधवारी (4 ऑक्टोबर) रविचंद्रन अश्विनने धोनीबाबत खास प्रतिक्रिया दिली.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘कुट्टी स्टोरीज विथ ऍश’ अनुभवी समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत चर्चा करत होता. दोघांमध्ये 2011 वनडे विश्वचषकाविषयी चर्चा सुरू होती. अशात भारताला 28 वर्षांनंतर इतिहासातील दुसरा विश्वचषक मिळवून देणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याचे कौतुक होणे निश्चित आहे. अश्विनच्या मते एमएस धोनी एक कर्णधार नसून सिने दिग्दर्शक आहे. कोणत्या खेळाडूला कोणते पात्र द्यायचे आणि त्याचा कधी उपयोग करून घ्यायचा, हे धोनीला चांगल्या पद्धतीने माहीत होते, असे अश्विन यावेळी म्हणाला.

हर्षा भोगले (Harsha Bhogle) याच्याशी चर्चा सुरू असताना धोनीचा विषय निघाल्यानंतर अश्विन म्हणाला, “धोनी एक कर्णधार नाही, तर दिग्दर्शक आहे. त्याच्या डोक्यात पात्र असतात. त्या पात्राला कोण न्याय देऊ शकेल, हे त्याला माहीत असते. योग्य वेळी तो त्या खेळाडूला निवडतो आणि आपले पात्र साकारण्यासाठी पुढे पाठवतो.” यावेळी हर्षा भोगलेंनी देखील धोनीचे कौतुक केले.

दरम्यान, एमएस धोनी याला भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जाते. त्याने भारताला 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर 2011 साली इतिहासातील दुसरा वनडे विश्वचषक जिंकलून दिला. 2013 साली भारताने धोनीच्याच नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. संघासाठी या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. (MS Dhoni is not a captain but a director said Ravichandran Ashwin )

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाचा गर्व मोडणारा पंत! ‘असा’ भीमपराक्रम करण्याची डेरिंग त्याच्याशिवाय कुणालाच नाही जमली, वाचाच
World Cup 2023 । कर्णधारांच्या कार्यक्रमात रोहितचे मजेशीर उत्तर, बाबर आझमची प्रतिक्रियाही चर्चेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---