भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतातच नाही जर तो जिथे जाईल तिथे त्याचे चाहते भेटतात. अगदी तो निवृत्त झाल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही. याचच प्रत्यय नुकताच आला आहे. धोनीचा एका वयस्कर आजींबरोबरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
धोनीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो एका वयस्कर महिलेशी गप्पा मारत आहे. तिच्या आजूबाजूला काही लोक आहेत. ती महिला धोनीशी अगदी साधेपणाने गप्पा मारत आहे. तिच्या कुटुंबाविषयी माहिती देत आहे. तसेच तिने धोनीला मनभरुन आशिर्वादही दिले.
सध्या अशी चर्चा आहे की धोनी एका जाहिरातीनिमित्त मुंबईत आहे. याच दरम्यानचा ही आजी त्याला भेटायला आल्याचा कयास लावला जात आहे. तरी हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे, याबाबत पूर्ण स्पष्टता नाही.
या व्हिडिओमध्ये दिसले की ही आजी धोनीला सांगते की तिच्याकडे अनेक दुकाने आहेत. तिला ५ मुले असून ती आता तिच्या नातवंडांमध्ये वेळ घालवते. यावर धोनी तिला म्हणतो, हीच वेळ चांगली असते आपल्या नातवंडांमध्ये वेळ घालवण्याची कारण मुले मोठी होत असताना असा वेळ मिळत नाही.
याबरोबरच आजीने धोनीला किती मुले आहेत, असे विचारले, त्यावर धोनीने त्याला एक मुलगी असल्याचे सांगितले. पुढे ती महिला धोनीला म्हणाली, जर तुला मुलगा झाला तर त्याचं नाव तू रोशन ठेव. तो तुझं नाव मोठं करेल. तसेच या आजीने धोनीला आशिर्वाद दिले.
https://www.instagram.com/p/CKVw_btJKxI/
मागीलवर्षी धोनीने घेतली निवृत्ती –
धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या चौदाव्या आयपीएल हंगांमातही खेळताना दिसेल.
धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १ द्विशतकांचा आणि ५ शतकांचा, तसेच ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉशिंग्टन सुंदरने वडिलांकडे सोपवली ‘टेस्ट कॅप’, सोशल मीडियावर होतंय कौतुक
सिडनीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह एकत्र लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, आर अश्विनचा खळबळजनक खुलासा
‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या त्या कृतीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान