येत्या जुलै महिन्यात युवा खेळाडूंची भरमार असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यावर त्यांना ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. मर्यादित षटकांच्या या मालिकांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात ५ नवीन चेहऱ्यांना जागा देण्यात आली आहे. परंतु निवडकर्त्यांच्या काही निर्णयांनी क्रिकेट चाहत्यांसह माजी भारतीय क्रिकेटपटूंनाही चकित केले आहे. भारताचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा हेदेखील एका अष्टपैलू खेळाडूच्या निवडीशी असहमत आहेत.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे अधिकतर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता खेळाडूंना संघात जागा दिली गेली आहे. अशात ३२ वर्षीय अष्टपैलू कृष्णप्पा गौतम हा नव्याने संघात सहभागी झाला आहे. परंतु गौतमला आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात त्याच्या संघनायकाने एकाही सामन्यात खेळवले नाही. तरीही त्याची का निवड केली गेली? असा प्रश्न चोप्रा यांनी उपस्थित केला आहे.
चोप्रा म्हणाले की, “राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने या हंगामात ठीक ठाक प्रदर्शन केले आहे. त्याच्या प्रदर्शनाला जास्त वाईटही म्हणता येणार नाही. तरीही त्याला संघाबाहेर केले गेले. याचा अर्थ काय होतो? त्याला का निवडले गेले नाही? त्याला न निवडता कृष्णप्पा गौतमला घेतले गेले.”
“मागच्या वेळी संघ निवडीसाठी गौतमचे नाव नव्हते आणि त्याने आयपीएल २०२१ मध्ये एकही सामना खेळला नाही. जर त्याचा कर्णधार एमएस धोनीने त्याला एकाही सामन्यासाठी संघात घेतले नाही. तर तुम्ही कोणत्या गोष्टीच्या आधारावर त्याच्यावर इतका विश्वास दाखवला?” असा प्रश्न त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.
तेवतियाचे प्रदर्शन गौतमपेक्षा चांगले
चोप्रा यांनी म्हटल्याप्रमाणे आयपीएल २०२१ च्या लिलावात गौतमला तब्बल ९.२५ कोटींची बोली लावत विकत घेतले होते. परंतु आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कर्णधार धोनीने त्याला एकाही सामन्यात अंतिम एकादशमध्ये जागा दिली नाही. एवढेच नव्हे तर, आयपीएल २०२० मध्येही त्याला अवघे २ सामने खेळायला मिळाले होते.
याउलट अष्टपैलू तेवतियाची आकडेवारी पाहिली तर, त्याने आयपीएल २०२१ मध्ये ७ सामने खेळताना ८६ धावा आणि २ विकेट्ची कामगिरी केली आहे. गतवर्षी १४ सामने खेळताना २५५ धावा आणि १० विकेट्सची त्याने खात्यात नोंद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेपुर्वी दिग्गजाची इंग्लंडला चेतावणी; म्हणाले, ‘रोहित सहज २-३ शतके ठोकणार’
ब्रॉडची ‘या’ नियमावर नाराजी व्यक्त; म्हणाला, ‘आयसीसीने तातडीने काढून टाकला पाहिजे तो नियम’