मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुन्हा पहिल्या ५ खेळाडूंमध्ये येण्याची संधी आहे.
कोलकातामध्ये २५मे रोजी झालेल्या सामन्यात शिखर धवनने धोनीला मागे टाकत ६व्या स्थानावर झेप घेतली होती.
सध्या धोनीच्या नावावर १७४ सामन्यात ४०.१६च्या सरासरीने ४०१६ धावा आहेत. त्यात २० अर्धशतकांचा समावेश आहे.
तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या ७व्या स्थानावर आहे तर आयपीएलमध्ये १४१ सामन्यात ३३.३२ च्या सरासरीने ४०३२ धावा करणारा शिखर धवन ६व्या स्थानावर आहे.
धोनीने जर आज ६९ धावा केल्या तर पहिल्या ५ खेळाडूंमध्ये येऊ शकतो. अशीच संधी आज शिखर धवनलाही आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
4953 धावा (सामने- 175): सुरेश रैना
4948 धावा (सामने- 163): विराट कोहली
4493 धावा (सामने- 173): रोहित शर्मा
4217 धावा (सामने- 154): गौतम गंभीर
4084 धावा (सामने- 164): राॅबीन उथप्पा
4032* धावा (सामने- 141): शिखर धवन
4016 धावा (सामने- 174): एमएस धोनी
4014 धावा (सामने- 114): डेविड वार्नर
महत्त्वाच्या बातम्या-
–एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?
–२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!
-Breaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो!
–१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम
–राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!






