काल भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने रोमहर्षक झालेल्या सामन्यात श्रीलंका संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. यात सर्वात मोठी जबाबदारी भारताच्या माजी कॅप्टन कूल एमएस धोनीने पार पाडली.
६८ चेंडूंचा सामना करताना धोनीने १ चौकारच्या मदतीने ४५ धावा केल्या. ही नक्कीच धोनी स्टाईल खेळी नसली तरी संघाला गरज असताना धोनीने पुन्हा एकदा पुढे येऊन सामना जिंकून दिला. त्याला तेवढीच चांगली साथ भुवनेश्वर कुमारनेही दिली.
कालच्या या खेळीत धोनीने अनेक विक्रमही केले. त्यापैकी काही विक्रम
#१ कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यात सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर. तब्बल १२० वेळा धोनी आजपर्यंत नाबाद. यापूर्वी हा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता.
#२ वनडे यष्टीरक्षक म्हणून सार्वधिक वेळा स्टॅम्पिंग अर्थात यष्टिचित करण्याचा विक्रम आता संयुक्तपणे धोनी आणि कुमार सांगकाराच्या नावावर. दोघांनीही ९९वेळा फलंदाजांना यष्टिचित केले आहे.
#३ धोनीच्या ९९वेळा यष्टिचित पैकी सर्वाधिक यष्टिचित हे हरभजन सिंग(१९), रवींद्र जडेजा(१५), आर अश्विन(१४) यांच्या गोलंदाजीवर केले आहेत.
#४ धोनी आणि भूवनेश्वर कुमार ही पहिली भारतीय जोडी आहे ज्यांनी ८व्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली.
#५ ८ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर शतकी भागीदारी कसोटी आणि वनडेमध्ये करणारी धोनी- भुवी ही केवळ तिसरी जोडी. यापूर्वी अशी कामगिरी बापू नाडकर्णी आणि फारूक इंजिनीर या भारताच्या तर माहेला जयवर्धने आणि चामिंडा वास या लंकेच्या जोडीने केली आहे.