इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना दसऱ्याच्या मूहुर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत चेन्नईने चौथ्या वेळी आयपीएल चषकावर नाव कोरले. मात्र, विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने केलेले एक वक्तव्य त्याच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवणारे होते.
कोलकाता विजयाचा हकदार
आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर समालोचक हर्ष भोगले यांनी खेळाडूंशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धोनी याला त्याच्या संघाच्या गुणवत्तेवर काहीतरी बोलण्यास सांगितले. यावर धोनी म्हणाला, चेन्नईच्या विजयाबाबत काही बोलण्यापूर्वी केकेआरबद्दल बोलले पाहिजे. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे कामगिरी केली, ती स्तुत्य आहे. हंगामाच्या पूर्वार्धात केकेआरला ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले होते. अशा स्थितीत उत्तरार्धात इतके सामने जिंकणे आणि अंतिम फेरीत स्थान मिळवणे हे उत्तम कामगिरी म्हटले जाईल. यासाठी त्यांच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले पाहिजे. खरोखर ते जिंकण्यासाठी पात्र होते.”
चेन्नई चौथ्यांदा विजेता
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चौथ्यांदा आयपीएल जिंकली आहे. हर्ष भोगले यांनी याचे श्रेय धोनीला दिले, तेव्हा कूल कर्णधाराने ते संघाला दिले. तो म्हणाला की, “हा संघ इतका चांगला आहे की कर्णधार होणे सोपे होते.” आयपीएल २०२१ मध्ये धोनी फलंदाज म्हणून फार चांगली कामगिरी करू शकला नाही आणि १६ सामन्यात फक्त १२४ धावा करू शकला. मात्र, टी२० कर्णधार म्हणून आपला ३०० वा सामना खेळत असताना त्याने संघाचे अप्रतिम नेतृत्व करत चौथी आयपीएल ट्रॉफी संघाच्या पारड्यात टाकली.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
ऐसा पेहली बार हुआ, इन चौदह सालों में! आयपीएल २०२१च्या उपविजेत्या केकेआरचा कोणालाही न जमलेला विक्रम