चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. रविवारी (१० ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्लीवर विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. हा सामना झाल्यानंतर एमएस धोनीने ऋतुराज गायकवाडबद्दल मोठा खुलासा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडने ५० चेंडुंमध्ये ७० धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर एमएस धोनीने म्हटले की, “जेव्हा मी आणि ऋतुराज गप्पा मारत असतो, त्यावेळी तो एक साधारण संवाद असतो. परंतु त्यावेळी माझा हेतू हा असतो की, त्याच्या मनात काय सुरु आहे हे मला जाणून घ्यायचं असतं. तो काय विचार करतोय. कारण तो एक असा खेळाडू आहे ज्याला पूर्ण २० षटके फलंदाजी करायला आवडते. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाल्या आहेत, हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”
तसेच ऋतुराज गायकवाडने देखील एमएस धोनीबाबत भाष्य करताना म्हटले की, “ते मला नेहमी प्रोत्साहित करतात, ज्यामुळे मला अधिक चांगले खेळण्याची प्रेरणा मिळत असते. ते नेहमी सांगतात की, जा आणि सामना संपवून ये.” धोनीने ऋतुराज गायकवाडवर या हंगामात विश्वास दाखवला आहे. तर ऋतुराज गायकवाडने देखील हा हंगामात चांगली कामगिरी केली आहे. तसेच निर्णायक सामन्यात देखील त्याने महत्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने तुफानी ६० धावांची खेळी केली.तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना, ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूंमध्ये सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने ६३ धावांचे योगदान दिले. तर शेवटी एमएस धोनीने जोरदार आक्रमण केले. त्याने नाबाद १८ धावांची खेळी करत, षटकार मारून चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ गडी हा सामना जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्स ऑफिसमध्ये सलमान आणि मोठ्या सामन्यात…’, जुना संघसहकारी केदारकडून धोनीचे खास शब्दांत कौतुक
कोण म्हणतं धोनी सोप्या मॅच अवघड करतो? आकडे तर वेगळंच काहीतरी सांगतायेत






