क्रिकेटच्या मैदानावर पंचगिरी करण्याचे काम तसं पाहिलं तर इतकं सोप्पं नसतं. आधुनिक क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे पंचाचे काम अधिक सोपे झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे पंचांचे निर्णयही काहीवेळा बदलले जातात आणि सामन्याचे एकूणच चित्र पालटले जाते. अनेक क्रिकेटपटू किंवा संघांबरोबर पंचांचे असे क्वचित किस्से घडतात जे चाहत्यांच्या कायम लक्षात राहतात. परंतु स्टिव्ह बकनर हे पंच होते, ज्यांचा भारतीय संघाबरोबर फार काही चांगला अनुभव राहिलेला नव्हता आणि त्यांच्या निर्णयांनी नेहमीच भारतीय संघाला प्रभावित केले होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे डॅरेल हार्पर या पंचांनीदेखील भारतीय संघाला त्रास देण्याच्या बाबतीत कोणतीही हयगय केली नाही.
हार्पर (Daryl Harper) यांनी भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) १९९९ मध्ये बाद देण्याची घटना कोणीही विसरणार नाही. त्यादरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात खेळताना मॅकग्राच्या चेंडूपासून बचाव करण्यासाठी सचिन खाली बसला असता चेंडू त्याच्या खांद्याला लागल्यामुळे हार्पर यांनी त्याला पायचीत (एलबीडब्ल्यू) घोषित केले होते. हार्पर यांनी त्यानंतर काही वर्षांनी असा निर्णय दिला होता, त्यावेळी मैदानावर आपले मत न मांडणारा एमएस धोनीही (MS Dhoni) कडाडला होता.
खरंतर ही घटना २०११ साली त्या कसोटी सामन्यादरम्यान घडली होती, ज्यावेळी प्रवीण कुमारने (Praveen Kumar) भारतीय संघात पदार्पण केले होते. त्या सामन्यात प्रवीणला खेळपट्टीवर धावल्यामुळे हार्पर यांनी संपूर्ण सामन्यासाठी त्याच्यावर बंदी घातली होती.
हार्पर यांनी स्वत: या घटनेचा उल्लेख केला आणि म्हटले, “धोनीने म्हटले होते, की त्यांनी कसोटी पदार्पण करणाऱ्या प्रवीण कुमारवर थोडी दया दाखवायला हवी होती. परंतु त्यापूर्वी प्रवीण ५२ वनडे सामने खेळला होता आणि त्याला नियमांबद्दल माहीत होते.”
“मला खूप चांगल्या प्रकारे आठवते, जेव्हा मी धोनीला सांगितले की प्रवीणवर बंदी घालण्यात येत आहे आणि तो या सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही, तेव्हा धोनी मला म्हणाला, ‘आम्हाला तुमच्याकडून आधीही त्रास झाला आहे.’ मी मनातल्या मनात हसत होतो. कारण माझ्या विधानासाठी मला सन्मानपूर्वक प्रतिक्रिया मिळाली नव्हती,” असेही धोनीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले.
हार्पर यांनी २००० मध्ये इशांत शर्मावरही (Ishant Sharma) अशाच प्रकारे बंदी घातली होती आणि कदाचित धोनीला याबाबतीत माहीत असावे.
जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा ती हार्पर यांची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात भारतीय संघाने ६३ धावांनी विजय मिळविला होता. असे असले तरीही त्या सामन्यानंतर हार्पर यांनी पुढील २ सामन्यात पंच म्हणून काम केले नव्हते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘माझे प्रशिक्षक अक्रम आणि शोएब अख्तरच्या चेंडूंचा सामना नव्हते करत, मी करायचो’
-आयपीएल २०२०मध्ये चाहत्यांना मिस कराव्या लागणार या ५ अतिशय रोमांचक गोष्टी
-टाईट सामना म्हणजे काय? या ३ कसोटी सामन्यांनी एक उदाहरण घालून दिले