दुबई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीपूर्वी दुसरा सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ९ गड्यांनी पराभूत करत सलग दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात भारताच्याकाही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. त्याचवेळी भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी हा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला यष्टीरक्षणाचे धडे देताना दिसून आला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
You know you're watching something special when you don't need the '???????????????????? ????????! ????' option…
Hit ❤️ if you enjoyed this MS Dhoni-Rishabh Pant class!
ICC #T20WorldCup #INDvsAUS #LiveTheGame pic.twitter.com/AtNbQRNzZS
— Star Sports (@StarSportsIndia) October 20, 2021
रिषभने घेतले धोनीकडून धडे
या सामन्यात भारतीय संघाने नियमित यष्टीरक्षक रिषभ पंतला विश्रांती दिली होती. मात्र, तो संघाचा भाग नसतानाही या स्पर्धेसाठी खास करून मेंटरचे काम पाहणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याला सीमारेषेजवळ यष्टीरक्षणाचे धडे देताना दिसून आला. त्यांचा हा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहेत. विशेष म्हणजे धोनी निवृत्त झाल्यापासून पंत यालाच त्याचा उत्तराधिकारी मानले जात आहे.
भारताचा दुसरा विजय
सुपर-१२ फेरीच्या आधीचा अखेरचा सामना असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. तरीही भारताच्या इतर गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला केवळ १५२ धावांवर रोखले. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दोन बळी मिळवले तर ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ याने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेले १५३ धावांचे आव्हान पार करताना सलामीवीर केएल राहुल व रोहित शर्मा यांनी झंझावाती फलंदाजी केली. राहुलने ३९ तर, रोहितने ६० धावांची खेळी केली. अखेरीस सूर्यकुमार यादव याने ३८ धावांवर नाबाद राहत भारताला ९ गड्यांनी विजय मिळवून दिला. विश्वचषकातील भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.





