जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघातील तीन प्रमुख खेळाडू निरोशन डिकवेला, कुसल मेंडीस व धनुष्का गुणतिलिका यांना बायो-बबल तोडल्याप्रकरणी तडकाफडकी संघातून निलंबित करण्यात आले होते. या सर्व खेळाडूंना उर्वरित मालिकेतून बाहेर काढून मायदेशी पाठवले गेले होते. त्यानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या सर्व खेळाडूंची शिक्षा जाहीर केली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सुनावणी शिक्षा
बायो-बबल तोडल्याप्रकरणी डिकवेला, मेंडीस व गुणतिलिका यांना संघातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावरील शिक्षेची अधिकृत घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (३० जुलै) केली. या खेळाडूंवर एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या बंदीबरोबरच सहा महिने देशांतर्गत क्रिकेटमधून दूर राहण्याची सजा सुनावली गेली आहे. तसेच या सर्व खेळाडूंना १० मिलियन श्रीलंकन रुपये म्हणजेच भारतीय रुपयात ३८ लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
अशी घडली होती घटना
जून महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा संघ कुसल परेराच्या नेतृत्वात तीन वनडे व तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. दुसऱ्या वनडे सामन्यानंतर हे तिन्ही खेळाडू डरहॅम येथे बायो-बबलबाहेर येऊन मजा करत होते. तसेच त्यांना धूम्रपान देखील करताना पाहिले गेलेले. एका चाहत्याने याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाला याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या तीन खेळाडूंना पुढच्या दिवशी मायदेशी पाठवले गेले होते.
श्रीलंका संघाने जिंकली भारताविरुद्धची मालिका
निलंबित केलेले तिन्ही खेळाडू संघातील वरिष्ठ खेळाडू होते. त्यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला इंग्लंडमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेआधी संघाचा नियमित कर्णधार कुसल परेरा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर, युवा अष्टपैलू दसुन शनाकाकडे श्रीलंका संघाचे नेतृत्व दिले गेले. संघाला भारताविरुद्ध वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. मात्र, टी२० मालिका जिंकत त्यांनी बरोबरी साधली.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका संघ लागला टी२० विश्वचषकाच्या तयारीला; दक्षिण आफ्रिकेसोबत करणार दोन हात, ‘असे’ आहे वेळापत्रक
लंडनमध्ये विराटची पत्नी अनुष्का बनली फोटोग्राफर; ‘या’ अंदाजातील फोटो केले क्लिक
टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून शिखर आणि राहुलमध्ये चढाओढ, पाहा कोण आहे आकडेवारीत सरस?