Shubman Gill Statement: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेपूर्वी बराच ड्रामा पाहायला मिळाला आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे 2 हंगाम गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या आता मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. फ्रँचायझी संघांनी ज्यादिवशी रिटेन खेळाडूंची यादी सोपवायची होती, त्याच्या एक दिवस आधी पंड्या गुजरातच्या रिटेन खेळाडूंच्या यादीत होता आणि सायंकाळपर्यंत त्याला मुंबईने ट्रेडही केले. गुजरात आणि पंड्यामध्ये पूर्ण रोख व्यवहार झाला. मात्र, या सर्वांनंतर गुजरातने शुबमन गिल याला कर्णधार बनवले. कर्णधार बनल्यानंतर शुबमनचा पहिला संदेश आला आहे. हा मेसेज गुजरातच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि हा व्हिडिओ पाहताच, चाहते अशाप्रकारच्या कमेंट्स करत आहेत की, व्हिडिओत गिलने पंड्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाला गिल?
शुबमन गिल (Shubman Gill) व्हिडिओत म्हणत आहे की, “ही भावना अद्याप कायम आहे. मला वाटते की, कर्णधार म्हणून पहिला सामना खेळेपर्यंत ही भावना अशीच राहील. ही खूपच चांगली भावना आहे. मी जेव्हा 7-8 वर्षांचा होतो, तेव्हा आयपीएल सुरू झाली होती. मला वाटते की, जो मुलगा क्रिकेटपटू बनण्याचा विचार करतो किंवा आयपीएल खेळण्याचा विचार करतो, त्याचे स्वप्न असते की, तो आपल्या संघाचे नेतृत्व करावे. ज्याप्रकारे हा संघ एकजुट होऊन पुढे जातो, ते पाहून खूप चांगले वाटते.”
पुढे बोलताना गिल असेही म्हणाला की, “आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, नेतृत्वासोबतच बऱ्याच गोष्टी येतात. वचनबद्धता हीदेखील त्यापैकीच एक आहे. शिस्त आहे, कठोर मेहनत आहे आणि निष्ठा यादेखील गोष्टी आहेत. मला वाटते की, मी महान कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. तेव्हा मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मला वाटते की, या अनुभवाचा मला फायदा मिळेल. आमच्या संघात महान लीडर्स आहेत. ज्यात केन विलियम्सन, राशिद खान, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. डेविड मिलरही आहे आणि वृद्धिमान साहाही संघाचा भाग आहे. या चांगल्या सुरुवातीसाठी मला तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि सोबत हवीये.”
😍 From a dreamy eyed fanboy of the IPL to a captain of the Gujarat Titans! Aapdo Shubman is raring to own his latest designation! Hear his first words from a brand new chapter… 💙#TitansFAM, ready for a new era of leadership? 💙#AavaDe pic.twitter.com/vmIN7I4LQY
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 29, 2023
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “पंड्यावर निशाणा. निष्ठा ही त्यापैकीच एक आहे.”
Bodied Pandya 😂😂
Loyalty is one of them pic.twitter.com/fAcOXvBnCp— RAJPUT 🚩🚩 (@kyadekhrahe) November 29, 2023
आयपीएल 2023 गाजवली
शुबमन गिल याने आयपीएल 2023 स्पर्धा गाजवली होती. त्याने 17 सामने खेळताना 59.33च्या सरासरीने आणि 157.80च्या स्ट्राईक रेटने 890 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा पाऊस पाडला होता. 129 ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी ठरली होती. (did batter shubman gill target hardik pandya after becoming the captain of gujarat titans see viral video)
हेही वाचा-
World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’
बुमराह आयपीएलमध्ये गुजरात संघाचा कर्णधार होण्याचा विचार करतोय! दिग्गज क्रिकेटरचे भाष्य