---Advertisement---

“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!

On: सोमवार, मार्च 18, 2024 3:30 PM
Rohit Sharma Hardik Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल मधील आपला प्रवास सुरू केला होता. हार्दिक 2015 ते 2021 दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यानंतर त्यानं 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं.

आयपीएलच्या या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघात परतला असून, त्याला संघाचा नवा कर्णधारही करण्यात आलंय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सनं आयपीएल 2022 चं जेतेपद पटकावलं होतं, तर 2023 मध्ये संघ उपविजेता राहिला होता.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्या दरम्यान दोघांनीही रोहितबाबत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. जेव्हा हार्दिक पांड्याला विचारण्यात आलं की, मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारल्यापासून तो रोहितशी बोलला आहे का, तेव्हा त्याचं उत्तर ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हार्दिक पांड्याला विचारण्यात आलं की, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर तू रोहित शर्माशी बोललास का?” पांड्यानं उत्तर दिलं, “हो आणि नाही देखील… तो (रोहित) सतत प्रवास करत होता.” जेव्हा हार्दिकला रोहितच्या जागी कर्णधार बनवण्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं, “रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. तो मला मदत करेलच. या संघानं जे काही साध्य केलं ते रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवलं आहे. मी फक्त हा प्रवास पुढे नेणार आहे. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली खेळली. मला माहित आहे की त्याचा मला नेहमीच पाठिंबा राहील.”

प्रशिक्षक मार्क बाउचरला विचारण्यात आलं की, “कर्णधारपदाचं दडपण दूर झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करेल का?” यावर मार्क म्हणाला, “मी नुकतंच रोहितला इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना पाहिलं. तो चेंडू चांगला मारत होता आणि चांगल्या लयीत दिसत होता. रोहितवर कर्णधारपदाचं दडपण राहणार नाही. त्यामुळे त्याला अधिक मोकळेपणानं खेळण्याचं स्वातंत्र्य मिळेल. त्यानं हे केलं तर मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेत खूप पुढे जाऊ शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश

ट्रॉफी जिंकल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत दिसली स्मृती मानधना? व्हायरल फोटोमधील ‘हा’ व्यक्ती कोण?

सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे ‘या’ पक्षाला दिला 5 कोटी रुपयांचा निधी, अहवालात धक्कादायक माहिती उघड!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---