---Advertisement---

मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम?

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 9:38 PM
---Advertisement---

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy 2024) मधील ॲडलेड कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघ अवघ्या 180 धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 86 धावा करून सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) एका विचित्र कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. कारण याच सामन्यात त्याने क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा शोएब अख्तरचा रेकाॅर्ड मोडला. पण या प्रकरणात किती सत्यता आहे. हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.

क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकाॅर्ड पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) नावावर आहे. अख्तरने ताशी 161.3 किमी वेगाने गोलंदाजी केली. पण जेव्हा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ॲडलेड कसोटीत गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या एका चेंडूवरील स्पीडोमीटरने ताशी 181.6 किमीचा वेग दाखवला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना ऑस्ट्रेलियन डावाच्या 24व्या षटकात घडली, जी स्पीडोमीटरमध्ये स्पष्टपणे त्रुटी होती.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची स्थिती चांगली आहे. भारतीय संघ अवघ्या 180 धावांवर सर्वबाद झाला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 86 धावा केल्या होत्या आणि अजूनही त्यांच्या 9 विकेट्स शिल्लक होत्या. सध्या ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात 94 धावांनी मागे आहे.

मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 2020 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 32 कसोटी सामने खेळले आहेत. 32 कसोटी सामन्याच्या 59 डावात गोलंदाजी करताना त्याने 85 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 29.67 राहिली आहे. तर इकाॅनाॅनी रेट 3.34 राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS; “रोहितचा पुढचा पाय अडकला…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाने रोहितच्या जखमेवर चोळले मीठ
“या कारणामुळे कसोटीत तुझी सरासरी 50च्या खाली गेली”, संजय मांजरेकरांचा कोहलीला सल्ला
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे टाॅप-5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---