---Advertisement---

रोहित शर्माने खरंच शार्दुल ठाकुरच्या बॅटने लॉर्ड्सवरील ऐतिहासिक शतक झळकावले? सत्य आले समोर

On: सोमवार, जुलै 20, 2026 4:43 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने रविवारी (19 जुलै) लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतकी खेळी करत टीकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्याआधी त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले होते. तसेच तो फॉर्ममध्ये नाही, यामुळे लॉर्ड्सनंतर तो निवृत्ती घेईल, असे म्हटले जात होते. आता मात्र त्याने एका शतकाने पूर्णपणे स्थिती बदलली आहे. आता हे शतक त्याने ज्या बॅटने केले, त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

फलंदाजीवेळी रोहितचा एक शॉट चुकला, तेव्हा त्याने आपली बॅट तपासली. त्या बॅटच्या खालच्या बाजूला एक नाव दिसले, शार्दुल ठाकुर. यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की रोहित शार्दुलच्या बॅटने खेळत होता का. जेव्हा त्याने शतक केले तेव्हा त्याने खरोखरच शार्दुलच्या बॅटने ही कामगिरी केली का. या सर्व प्रश्नांची उत्तरे खुद्द शार्दुलने दिली आहेत.

शार्दुलने एका माध्यम संस्थेशी बोलताना म्हटले, “मी एसएस बॅट्ससोबत करार केला आहे. जतीन सरिन (क्वीन मालक) यांनी मला काही उत्कृष्ठ बॅट्स पाठवल्या आहेत. रोहितला त्या बॅट्स खूप आवडल्याने त्याने मला काही बॅट्स मागितल्या होत्या. आमची चांगली मैत्री असून क्रिकेटमध्ये चांगले क्षण अनुभवले आहे. म्हणून त्याला बॅट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. आज मला खूप आनंद झाला आहे की, त्याने लॉर्ड्सवर माझ्या बॅटपैकी एक वापरून शतक केले.”

शार्दुलच्या या वक्तव्यावरून असे स्पष्ट होते की रोहितने शार्दुलच्या बॅटनेच शतकी खेळी केली. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. तसेच ते एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात.

रोहितचे शतक वाया कारण भारत हरला
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर रचला होता. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात चांगली झाली होती. रोहितने कर्णधार शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली, मात्र गिल 77 धावा करत बाद झाला. त्यानंतर रोहितने विराट कोहलीसोबत डाव सांभाळला.

रोहित-विराटने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहित 138 धावा करत बाद झाला. तसेच विराटही 74 धावा करत परतला. त्यानंतर मात्र भारताच्या विकेट्स पडतच राहिल्या. भारत 50 षटकांत 360 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला आणि सामना 27 धावांनी गमावला. (Did Rohit Sharma really score a historic lord’s century using Shardul Thakur bat vs eng ? truth has come to light.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---