पुणे – डिएगो ज्युनियर्स आणि एफसी जोसेफ संघांनी शानदार विजयासह पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) द्वितीयश्रेणी मोहिमेस यशस्वी सुरवात केली. दरम्यान उत्कर्ष क्री़डा मंचच्या १६ वर्षांखालील गटात मोठा विजयात अनिकेत अवघडे याने ८ गोल नोंदवले.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या अ गटातील दोन्ही सामने निर्णायक झाले. डिएगो ज्युनियर्स संघान व्हॅली हंटर्सचा ३-० असा पराभव केला. स्वयं गोलने त्यांचे खाते उघडले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाा दीपक मोरयाकडून हा गोल झाला. त्यानंतर ऑस्टिन अल्मेडा याने ३०व्या, तर हर्षित कामदार याने ६२व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर झालेल्या सामन्यात एफसी जोसेफने सामन्याच्या ३२व्या मिनिटाला प्रविण नागरीक्रांती याने नोंदविलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर सनी डेज संघाचा १-० असा पराभव केला. प्रविणने हा गोल पेनल्टी किकवर केला.
ब गटातील सामन्यात पीसीएच लायन्सला नॅशनल युथ एफए संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. बोपोडी एसए संघाने एनडीए युथ संघालाही १-१ असे बरोबरीत रोखले. सी गटातील घोरपडी तमिळ युनायटेड आणि केशव माधव प्रतिष्ठान संघामंधील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या दोन सामन्यात गोलांचा ३४ पाऊस पडला. उत्कर्ष क्रीडा मंचने या पावसात २१ गोल नोंदवून दणदणीत विजयी सलामी दिली. यामने अनिकेत अवघडे याने ८ गोल केले. त्याला अनिकेत सिंगने ४, निलेश डरे याने तीन गोल करून सुरेख साथ केली. याच मैदानावरील दुसऱ्या सामन्यात लौकिक एफए संघाने रायन एफएचा १३-० असा धुव्वा उडवला.
निकाल –
एसएसपीएमएस मैदान –
द्वितिय श्रेणी – गट अ -दिएगो ज्युनियर्स ३ (दिपक मौर्य – स्वयं गोल, ऑस्टिन अल्मेडा ३०वे, हर्षित कामदार ६२वे मिनिट) वि.वि. व्हॅली हंटर्स ०
एफसी जोसेफ १ (प्रविण नागरीक्रांती ३२वे मनिट)
ब गट – पीसीएच लायन्स १ (छेट गुरुंग १६वे मिनिट) बरोबरी वि. नॅशनल युथ एफए (एनवायएफए)१ (ऋषिकेश शेवाळे २९वे मिनिट)
बोपोडी एस.ए. १ (चक्र बसवाकर्मा ७२वे मिनिट) बरोबरी वि. एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब १ (शेर बहादूर छेत्री ६०वे मिनिट)
क गट – घोरपडी तमिळ युनायटेड ० बरोबरी वि. केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हन ०
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मैदान
१६ वर्षांखालील – गट ए – रायझिंग पुणे पुढे चाल वि. एआयएफए स्काय हॉक्स,
क्रीडा प्रबोधनिनी पुढे चाल वि. केशव माधन प्रतिष्ठान
सी गट – उत्कर्ष क्रीडा मंच (युकेएम) २१ (अनिकेत अवघडे ९, ११, ३०, ३३, ३४, ५८, ७४, ७८वे मिनिट, निलेश डरे १३, ३७, ७७ वे मिनिट, अनिकेत सिंग २८, ७३, ७६, ८०वे मिनिट, कौशल वैद्य ३६, ३९वे मिनिट, रुद्रेश गौडनोर ४०वे मिनिट, प्रज्वल शिंदे – ४६वे मिनिट स्वयंगोल, सोहम निलंगेकर ५४वे मिनिट, श्रीनिवास देशपांडे ६६वे मिनिट) वि.वि. यंग स्टेप्स ०
लौकिक एफए १३ (सोहम नामजोशी ३रे, ४२, ५६, ६४वे मिनिट, अर्जुन पी. – १०वे मिनिट स्वयंगोल, ए. गायकवाड २३, ३४, ५१वे मिनिट, कनिष्क नेने ३०, ७५वे मनिट, अरुंष वानखेडे ३३वे मिनिट, आदित्य साळुंके ५९वे मिनिट, स्वस्ती पवार ६९वे मिनिट) वि.वि. रायन एफए ०
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई- कोलकाता सामन्यात बनले ‘हे’ ११ विक्रम, जसप्रीत बुमराहने लुटली वाहवा; जाणून घ्या एका क्लिकवर
यशस्वी संघाचं बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची गाडी आयपीएल २०२२मध्ये रुळावरून खाली! मोडला आपलाच नकोसा विक्रम
रोहित शर्माच्या विकेटमुळे सोशल मीडियावर पेटला वाद, पंचांच्या निर्णयावर भडकले चाहते