प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेते दिलीप कुमार यांचे आज (७ जुलै) वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी सकाळी ७:३० वाजता हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या ८ दिवसांपासून रुग्णालयात होते. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांचे निधन झाल्याची बातमी येताच बॉलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु अनेकांना हे ऐकून आश्चर्य होईल की, दिलीप कुमार यांच्यामुळे एक भारतीय क्रिकेटपटू घडला होता.
प्रसिद्ध हिंदी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये १९८३ विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील सदस्यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये खेळाडूंचे न माहीत असलेले किस्से उघडीकिस आले होते. असाच एक किस्सा सांगितला होता, माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांनी.
१९८३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या यशपाल शर्मा यांनी खुलासा करत म्हटले होते की, “दिलीप कुमार यांच्यामुळेच माझी क्रिकेट कारकीर्द घडली.” अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून यशपाल शर्मा यांना संधी देण्यात आली होती. (Dilip Kumar made career of Cricketer yashpal sharma and helped to get entry in team india 1983 world cup)
https://twitter.com/TheDilipKumar/status/1412600233062699008?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1412600233062699008%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.prabhatkhabar.com%2Fsports%2Fcricket%2Fdilip-kumar-made-career-of-cricketer-yashpal-sharma-and-helped-to-get-entry-in-team-india-1983-world-cup-rkt
यशपाल शर्मा यांनी म्हटले होते की, “दिलीप कुमार मी खेळत असलेला रणजी सामना पाहण्यासाठी आले होते. परंतु मला याबाबत कुठलीही माहिती नव्हती. त्याच सामन्यात मी उत्तम खेळी केली होती. इतकेच नव्हे तर सामना झाल्यानंतर, दिलीप कुमार यांनी मला भेटायला बोलावले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत हात मिळवला आणि म्हटले की, तुझ्यात ती गोष्ट आहे… मी कोणासोबत तरी बोलून बघतो.”
यशपाल शर्मा दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. खूप वेळेनंतर त्यांना ही गोष्ट कळाली होती की, दिलीप कुमार यांनी यशपाल शर्माचे नाव बीसीसीआयला सुचवले होते. १९८३ विश्वविजेत्या संघात यशपाल शर्मा यांनी मुख्य भूमिका बजावली होती. भारतीय संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत १९८३ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. यामध्ये यशपाल शर्मा यांनी मोलाचे योगदान दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या ‘त्या’ शॉटने गांगुलीलाही पाडली होती भुरळ, कॉमेंट्री बॉक्स सोडून आला होता बाहेर
दु:खद बातमी! महान हॉकीपटू केशव दत्त कालवश, आर्मींसाठी सुवर्णपदक केले होते दान
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं