तमिळनाडु प्रिमियर लीगच्या तिसऱ्या मोसमाला ११ जुलैपासून सुरूवात होणार आहे. याची शुक्रवारी घोषणा केली. पहिली लढत दिंडिगुल ड्रॅगन विरूद्ध रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यात तिरूनेलवेली येथील आयसीएल (इंडियन सिमेंट कंपनी लि.) मैदानावर खेळवली जाणार आहे.
या मोसमात आठ संघ असणार आहेत, यांच्यात एकूण ३२ लढती खेळवल्या जाणार आहेत.
एनपीआर कॉलेज ग्राउंड दिंडिगुल, एम.ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई, आयसीएल ग्राउंड तिरूनेलवेली या तीन ठिकाणी मोसमातील सर्व लढती खेळवल्या जातील. चेपॉकवरती अंतिम सामना धरून फक्त चार लढती खेळवल्या जातील. स्पर्धेतील अंतिम सामना १२ ऑगस्टला खेळला जाईल.
गतविजेते चेपॉक सुपर गिलिज यांची पहिली लढत त्रिची वॉरियर्स विरूद्ध १४ जुलैला चेपॉकवरती खेळवली जाईल.
“दिंडिगुल, तिरूनेलवेली या दोन ठिकाणी सर्वांत जास्त सामने ठेवण्याचे कारण असे कि तेथे क्रिकेटचा प्रसार, खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे, लोकांना चांगले क्रिकेट पहायला मिळेल.” असे तमिळनाडु क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर.एल पलानी म्हणाले.
या स्पर्धेतील विजेत्याला १ कोटी रू., उपविजेत्याला ६० लाख रू., तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला प्रत्येकी ४० लाख रू. मिळतील. इंडिया सिमेंटस लिमिटेड टीएनपीएलचे स्पॉन्सरस असतील.
दुपारी ३.१५ वाजता आणि संध्याकाळी ७.१५ वाजता असे,दिवसातून दोन साखळी सामने खेळवले जातील. रविवारी फक्त एकच संध्याकाळी ७.१५ लढत खेळवली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या:
–पराभवामुळे लगेच अफगानिस्तान संघाला दोष देऊ शकत नाही- अजिंक्य रहाणे
–ऐकावे ते नवलच! ११६ वर्षांनंतर भारतीय संघाने केला असा कारनामा
–सर जडेजांचा मोठा पराक्रम, आजपर्यंत केवळ एका भारतीयाने केला आहे हा भीमपराक्रम