इंग्लंड आणि भारत यांच्यात लॉर्ड्स झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर निक काॅम्पटनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. निकने त्याच्या ट्विटर खात्यावरून विराटविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. ट्विटमध्ये निकने लिहिले आहे विराट कोहली सर्वात जास्त शिव्या देणारा व्यक्ती आहे. निकने केलेल्या ट्विटवर पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने त्याचे मत मांडले आहे.
निक काॅम्पटनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “कोहली सर्वात जास्त अपशब्द बोलणारा खेळाडू नाहीये का ? मी कधीच त्या गोष्टीला नाही विसरलो, जेव्हा मला २०१२ मध्ये अपशब्द बोलले गेले होते.” निक काॅम्पटनने इंग्लंडसाठी २०१२ ते २०१६ सालापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने इंग्लंड संघासाठी ७७५ धावा केल्या.
निक काॅम्पटनच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेटप्रेमींनी पलटवार केला आहे. त्याचसोबत कोहलीची बाजू मांडण्यासाठी आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया देखील उतरला आहे. दानिशने काॅम्पटनच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर निक काॅम्पटनला उत्तर दिले आहे. “एक इंग्लंडचा माजी क्रिकेटर आहे, जो विराटच्या राग व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे निराश आहे. हे योग्य आहे? आणि जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा? तुम्हाला नेहमीच राज्य करायचे आहे का?” असे दानिश म्हटला आहे.
दानिश कनेरिया पुढे बोलताना म्हणाला, “जेव्हा- जेव्हा तुमच्या विरोधात कोणता मोठा संघ असतो, तर तुम्ही त्यांना अपमानीत करण्यासाठी हीच पद्धत वापरता जी तुम्ही एवढी वर्ष वापरली आहे. तुम्हीच याला सुरूवात केली होती. जेव्हा जसप्रीत बुमराहा फलंदाजी करण्यासाठी आला होता. जाॅस बटलरने पहिल्यांदा बुमराहाला काहीतरी म्हटले होते आणि नंतर बाकीचे खेळाडूही यात सहभागी झाले.”
कनेरिया म्हणाला, “कोहली कर्णधाराच्या रूपात फक्त आक्रमकता दाखवत होता आणि प्रेक्षक त्याचे समर्थन करत होते. शिवीगाळ बाबत बोलायचे झाल्यास आम्हीही क्रिकेट खेळले आहे आणि जोपर्यंत थोडीशी चोष्टा होत नाही, तोपर्यंत मजा येत नाही. मला नाही पटत की कोहलीने कोणत्या अभद्र भाषेचा वापर केला आहे. कोहलीने जी आक्रमकता दाखवली, त्यामुळे भारताला हा कसोटी सामना जिंकण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. ”
याआधी भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत झालेल्या वादांविषयी बोलताना म्हटले होते की, जर कोणी भारतीय संघातील एका खेळाडूवर हल्ला केला, तर आम्ही ११ जणं मिळून त्यांना प्रत्युत्तर देऊ.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर चोरीचा आरोप, होऊ शकते पोलिस कारवाई
इंग्लंडमधील संघाची पोलखोल, माजी कर्णधारावर वर्णद्वेषाचे आरोप सिद्ध झाल्याने मागितली माफी
किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल






