---Advertisement---

टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर फलंदाज मिळो ना मिळो, आयपीएलमध्ये ‘या’ संघाला मात्र…

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 11:11 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा आठवा सामना पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ विकेट्स गमावत १४२ धावा केल्या.

हैदराबाद संघाच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाचे शुभमन गिल आणि सुनिल नरेन सलामीला फलंदाजासाठी मैदानावर उतरले. मात्र नरेन अवघे २ चेंडू खेळत शून्य धावेवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने १३ चेंडूत २६ धावांची दमदार खेळी केली. पण ४.४ षटकात खलील अहमदने त्याला डेविड वॉर्नरच्या हातून झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला.

त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी उतरला. परंतु तो केवळ ३ चेंडू खेळू शकला आणि खाते न उघडता मैदानावर बाहेर पडला. असे असले तरी, या धुरंधर फलंदाजाने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिकवेळा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि दरम्यान त्याने याच क्रमांकावर सर्वाधिक धावाही कुटल्या आहेत.

२००८ साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून दिनेशने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये एकूण १८४ सामने खेळले आहेत. त्यापैकी १६५ डावात फलंदाजी करताना त्याने ३६८४ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यातील ५७ डावात कार्तिकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. दरम्यान त्याने या क्रमांकावर तब्बल १३०८ धावा केल्या आहेत. हा आयपीएल स्पर्धेतील विक्रम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Update: असे आहेत आतापर्यंत टॉस जिंकलेल्या संघांच्या सामन्यांचे निकाल

टीम इंडीयाचा हुकमी एक्का आयपीएलमध्ये सपशेल फेल, ७ सामन्यात लाजीरवाणी कामगिरी

१२ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दूसऱ्यांदाच डेव्हिड वॉर्नरसोबत ‘असं’ घडलं

ट्रेंडिंग लेख-

मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व

IPL अपडेट : पाहा ७ सामन्यानंतर आयपीएलचा गुणफलक, तर ‘हे’ खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी

क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---