काही दिवसांपुर्वी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामातील आठवा सामना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १४२ धावा केल्या.
या सामन्यात कोलकाता संघाचा डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवला एकही विकेट घेता आली नाही. त्याने हैदराबादच्या पूर्ण डावात २ षटके टाकत १५ धावा दिल्या. महत्त्वाचे म्हणजे, कुलदीपची ही पहिली वेळ नाही. त्याने यापुर्वीच्या एक-दोन नव्हे तर सलग ७ आयपीएल सामन्यात गोलंदाजी करताना एकही विकेट घेतली नाही. Kuldeep Yadav last 7 IPL games Bowling Record
या सामन्यापुर्वी २३ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता संघाचा पहिला आयपीएल सामना झाला होता. त्या सामन्यात कुलदीपने ४ षटकात ३९ धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. तर यापुर्वी त्याने खेळलेल्या शेवटच्या आयपीएल सामन्यात एक विकेट मिळाली होती. परंतु ती विकेटदेखील यष्टीमागे उभा असणाऱ्या मोईन अलीने घेतली होती.
तर त्यापुर्वीच्या सामन्यात कुलदीपची गोलंदाजी आकडेवारी ३ षटके २८ धावा, ४ षटके २८ धावा, ४ षटके १६ धावा, ४ षटके ३३ धावा अशी होती.
कुलदीपने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ४२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४१ डावात गोलंदाजी करत ३०.७२च्या सरासरीने केवळ ३९ विकेट्स घेतल्या आहेत.
शेवटच्या ७ आयपीएल सामन्यातील कुलदीप यादवची गोलंदाजी आकडेवारी
२ षटके १५ धावा, शून्य विकेट
४ षटके ३९ धावा, शून्य विकेट
४ षटके ५९ धावा, १ विकेट (यष्टीरक्षक मोईन अली)
३ षटके २८ धावा, शून्य विकेट
४ षटके २८ धावा, शून्य विकेट
४ षटके १६ धावा, शून्य धावा
४ षटके ३३ धावा, शून्य विकेट
महत्त्वाच्या बातम्या-
१२ वर्षात पहिल्यांदाच आली वॉर्नरवर अशी वेळ, धावा तर केल्या पण…
याला म्हणतात योगायोग! तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि अगदी सेम टू सेम विकेट
सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सने ‘या’ दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली
ट्रेंडिंग लेख –
मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे






