शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील आठवा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघाचा हा या हंगामातील दूसरा सामना होता.
या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्या डावातील हैदराबाद संघाची ठरलेली सलामीची जोडी, वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. मात्र यष्टीरक्षक फलंदाज बेयरस्टो कोलकाताचा गोलंदाज पॅट कमिन्सच्या दूसऱ्या षटकातील ५व्या चेंडूवर त्रिफळाचीत होत पव्हेलियनला परतला.
या विकेटचा एक गजब योगायोग जुळून आला. आजच्या सामन्याच्या बरोबर १० दिवस आधी म्हणजेच १६ सप्टेंबर २०२०ला इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेयरस्टो सलामीला फलंदाजासाठी मैदानावर उतरला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कमिन्सनेच बेयरस्टोला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला होता.
https://twitter.com/__mubean__/status/1309867878640807937?s=20
एका चाहत्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने या व्हिडिओला ‘कमिन्स विरुद्ध बेयरस्टो’ असे कॅप्शन दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविडच्या फलंदाजीचे अफलातून समालोचन करणाऱ्या डीन जोन्सचा व्हिडीओ व्हायरल
…आणि ‘असा’ निर्णय घेणारा सनरायझर्स हैदराबाद ठरला पहिलाच संघ
“सीएसकेच्या फलंदाजांनी ग्लुकोज घेऊनच मैदानात या,” दिग्गजाने साधला निशाणा
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे
आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज