शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील आठवा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघाचा हा या हंगामातील दूसरा सामना होता.
या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्या डावातील हैदराबाद संघाची ठरलेली सलामीची जोडी, वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. वॉर्नरने सुरुवातीला दमदार फटकेबाजी करत २ चौकार आणि १ षटकार लगावला. पण १०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. त्यामुळे वॉर्नर ३० चेंडूत केवळ ३६ धावा करु शकला.
यापुर्वी २१ सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यातही वॉर्नर केवळ ६ धावांवर बाद झाला होता. आपल्या आतापर्यंतच्या १२ आयपीएल हंगामांच्या कारकिर्दीत वॉर्नरसोबत दूसऱ्यांदाच असे घडले आहे. २०१४ व २०२० वगळता आयपीएलच्या १० हंगामात वॉर्नरने पहिल्या दोन सामन्यात एकदातरी ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
यापुर्वी २०१४ साली म्हणजे आयपीएलच्या ७व्या हंगामातील आपल्या पहिल्या २ सामन्यात ५०पेक्षा जास्त धावा करु शकला नव्हता. २०१४ साली हैदराबाद संघाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात वॉर्नर ३२ धावांवर बाद झाला होता. तर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या दूसऱ्या सामन्यात वॉर्नरने फक्त ८ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात योगायोग! तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि अगदी सेम टू सेम विकेट
सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सने ‘या’ दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली
हैदराबाद सनरायझर्सच्या ‘या’ निर्णयाने आयपीएलच्या १३ व्या हंगामातील परंपराच मोडली
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे
आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज






