---Advertisement---

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे दिनेश कार्तिक; तरीही माजी दिग्गज म्हणतोय, ‘तो फिनिशर नाही’

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 7:07 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये दिनेश कार्तिक याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी जबरदस्त प्रदर्शन केले आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना देखील प्रभावित केले. आयपीएल हंगाम संपल्यानंतर कार्तिकने मोठ्या काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आणि सध्या तो संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यात आहे. संघात पुनरागमन केल्यापासून कार्तिक फिनिशरची भूमिका पार पाडत आहे. मात्र, भारतीय संघाचे माजी क्रिकटपटू आणि माजी निवडकर्ते कृष्णामाचारी श्रीकांत यांच्या मते कार्तिकच्या भूमिकेला फिनिशर म्हणता येणार नाही. 

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या ३७ वर्षांचा आहे आणि आगामी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी दावेदार मानला जात आहे. त्याचे प्रदर्शन दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे. आयपीएल २०२२ मध्ये कार्तिकने पुन्हा एकदा स्वतःची भूमिका सिद्ध केली होती आणि त्यानंतर भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडत आहे. भारतीय संघासाठी देखील त्याने काही सामने जिंकवून दिले आहेत. मात्र, माजी दिग्गज कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांच्या मते कार्तिक फिनिशर नाहीये. कारण तो फक्त शेवटच्या चार षटकांमध्ये खेळत आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान फॅनकोडवर श्रीकांत बोलत होते. ते म्हणाले की, “फिनिशरची तुमची व्याख्या चुकीची आहे. दिनेश कार्तिक खूप चांगले प्रदर्शन करत आहे. आयपीएलमध्येही तो चांगला खेळला आणि इथेही काही सामने असेच होते. मात्र, तो फिनिशर नाहीये. जो खेळाडू ८ व्या किंवा ९ व्या षटाकापासून खेळून सामन्याचा शेवट करतो, तो फिनिशर म्हणतात. दिनेश कार्तिक जे करत आहे, त्याला तुम्ही ‘फायनल टच’ म्हणू शकता. सूर्यकुमार यादवचेच घ्या, त्याने इंग्लंडमध्ये जवळपास स्वतःच्याच जोरावर सामना जिंकवून दिला. ही फिनिशरची भूमिका आहे. हार्दिक पंड्या, रिषभ पंत फिनिशर आहे. आपला कर्णधार रोहित शर्मा जो डावाची सुरुवात करतो आणि १७ व्या षटकापर्यंत १२ गियरमध्ये फलंदाजी करतो, तो देखील फिनिशर आहे.”

“फिनिशर १६ ते २० या षटकांमध्येच खेळत नसतो. फिनिशर तो असतो, जो ८ व्या, ९ व्या षटकापासून खेळतो आणि शेवटी ६० च्या आसपास धावा करतो. दिनेश कार्तिकची भूमिका निश्चित ठरलेली आहे. तो कमालिचे प्रदर्शन करत आहे, पण फिनिशरच्या भूमिकेला तो फाइन-ट्यून (सोईनुसार बदलत आहे) करत आहे.”

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात कार्तिक ७ धावा करून बाद झाला. पण त्याआधी पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या १९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

CWG2022: भारतीय महिला हॉकी संघाची पाचव्यांदा उपांत्यफेरीत एंट्री, कॅनडाला केले पराभूत

थेट हृदयावर वार! झंझावाती अर्धशतकानंतर सूर्यकुमारची मन जिंकणारी कृती, Video व्हायरल

विराट कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा..! टी२० क्रमवारीत ८ वर्षांतील सर्वात वाईट स्थानी घसरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---