दिनेश कार्तिक मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघासाठी खेळत आला आहे. कार्तिकने यापूर्वी भारतासाठी दोन टी-20 विश्वचषक खेळले असून यावर्षीचा विश्वचषक त्याच्या एकंदरीत कारकिर्दीतील तिसरा टी-20 विश्वचषक आहे. कार्तिकने त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 विश्वचषक 2007 साली खेळला होता. त्यानंतर 2010 सालच्या टी-20 विश्वचषकात आणि आता 2022 साली खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात देखील त्याने संघात जागा बनवली. आयसीसी या प्रमुख स्पर्धेत खेळण्याचा कार्तिककडे मोठा अनुभव असला, तरी यादरम्यान त्याच्या नावावपुढे एका निराशाजनक प्रदर्शनची नोंद मात्र नक्कीच झाली आहे.
आयसीसीने 2007 साली पहिला टी-20 विश्वचषक आयोजित केला होता. भारतीय संघाने हा पहिला विश्वचषक नावावर केला. दिनेस कार्तिक (Dinesh Karthik) या विश्वचषकविजेत्या संघाचा भाग होता, पण काही खास कामगिरी मात्र करू शकला नव्हता. पुढे त्याने 2010 साली आयोजित केलेला टी-20 विश्वचषक देखील खेळला आणि यावेळी स्वतःची छाप पाडण्यात त्याला अपयश आले. यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात देखील कार्तिकची बॅट शांत आहे. 2007 आणि 2010 सालच्या विश्वचषकांपेक्षा यावर्षीचा विश्वचषक कार्तिकसाठी अधिक निराशा करणारा आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विश्वचषकांमध्ये कार्तिकने अजून एकही षटकार मारला नाहीये. हा नकोसा विक्रम नक्कीच त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक ठरतो.
एकंदरीत विचार केला, तर कार्तिकने 2007 सालच्या टी-20 विश्वचषकात 4 सामने खेळले होते. या चार सामन्यांमध्ये त्याने 9.33 च्या सरासरीने 28 धावा केल्या होत्या. 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धेत कार्तिकला एकूण 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये त्याने 14.50 च्या सरासरीने 29 धावा केल्या होत्या. यावर्षीच्या विश्वचषकात त्याने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि अवघ्या 4.66 च्या सरासरीने 14 धावा केल्या आहेत. कार्तिकने टी-20 फॉरमॅटमधील विश्वचषकात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत आणि यामध्ये एकही षटकार मारू शकला नाहीये. चाहते या स्पर्धेत कार्तिकच्या बॅटमधून निघालेला षटकार पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
यावर्षीच्या विश्वचषकापूर्वी कार्तिकने संघासाठी अनेक सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका पार पाडली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. मात्र, विश्वचषक सुरू झाल्यानंतर त्याचा फॉर्म पूर्णपणे बिघडल्याचे दिसते. कार्तिकने यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना रॉयल चॅलेंजर्ससाठी जबरदस्त प्रदर्शन केले आणि त्यानंतर वयाच्या 37 व्या वर्षी भारतीय संघात पुनरागमन देखील केले. पुनरागमनानंतर त्याने काही महत्वपूर्व सामन्यांमध्ये संघाला विजय देखील मिळवून दिला. पण विश्वचषकातील त्याचे प्रदर्शन पाहता, सुधारणा झाली नाही तर रिषभ पंत याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युपीला लोळवत पुणेरी पलटण अव्वलस्थानी! ‘सुलतान’ फझलने रचला प्रो कबड्डीत इतिहास
हैदराबाद एफसी विजयी मालिका कायम राखण्यासाठी ओडिशा एफसीविरुद्ध खेळणार