Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॅक्सवेलने वाचवली ऑस्ट्रेलियाची इभ्रत! 46 मीटरवरून केला सामना बदलणारा थ्रो; पाहा व्हिडिओ

November 4, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Instagram/ICC

Photo Courtesy: Instagram/ICC


ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या ‌‌‌‌‌‌टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) दिवसातील दुसरा सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. ऑस्ट्रेलियाला आपल्या उपांत्य फेरीचा आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजयाची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटी ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयामुळे त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची संधी अजूनही कायम आहे. मात्र, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने निर्णयाक क्षणी केलेल्या धावबादमूळे अचानक सामन्याला कलाटणी मिळाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला 42 चेंडूंवर 70 धावांची गरज होती. इब्राहिम झादरान व गुलबदीन नईब या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केलेली. त्या क्षणी अफगाणिस्तानचे सामन्यात पारडे जड होते. मात्र, त्याच षटकात अफगाणिस्तानचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

 

ऍडम झंपा टाकत असलेल्या षटकातील पहिला चेंडू झादरानने लॉंग ऑनच्या दिशेने मारला. तेव्हा 30 यार्डाच्या आत कोणताही क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत नव्हता. तेव्हा ग्लेन मॅक्सवेल याने मोठे अंतर पार करत तब्बल 46 मीटरवरून थेट फेक करत नॉन स्ट्राइकवरील यष्ट्यांचा वेध घेतला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेला नईब या थेटफेकीमुळे धावबाद झाला.

या धावबादनंतर सामन्याचा नूर पालटला. पुढच्या चेंडूवर झादरान तर त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर नजीब झादरान बाद होत परतले.‌ मात्र, मॅक्सवेलची ही फेक सामना बदलणारी ठरली. मॅक्सवेलने या सामन्यात फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले होते. स्पर्धेत आतापर्यंत अपयशी ठरत असताना त्याने या सामन्यात 32 चेंडूवर 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या. तसेच एक झेलही टिपला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: विश्वचषकातून बाहेर पडताच गंभीर आरोप लावत नबीने सोडले अफगाणिस्तानचे कर्णधारपद
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल


Next Post
India-vs-Pakistan

वर्ल्डकपमध्ये सर्वच संघांच्या कर्णधारांचे वाजलेत बारा! धावांसाठी करतायेत धावाधाव

Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB

पाकिस्तानी खेळाडू आता 'या' महत्वाच्या टी-20 लीगमध्येही खेळणार, क्रिकेट बोर्डाकडून मिळाली सूट

fOOTBALL

हैदराबाद एफसी विजयी मालिका कायम राखण्यासाठी ओडिशा एफसीविरुद्ध खेळणार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143