भारतीय संघ आयर्लंडची राजधानी डबलिन येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (२६ जून) डबलिनच्या मालाहिदे, द विलेज क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली असून त्याच्यांपैकी कोणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळणार हे पाहाण्याजोगे आहे.
भारतीय संघात दिनेश कार्तिक, इशान किशन आणि संजू सॅमसन या तीन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात इशान आणि कार्तिक हे दोघेही खेळले होते. त्यावेळी रिषभ पंतने यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. या तिघांपैकी आयर्लंड विरुद्ध कोणाला यष्टीरक्षक म्हणून संघात घ्यावे याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना रोहन गावसकरने कार्तिकला यष्टीरक्षक म्हणून घ्यावे, असे मत मांडले आहे. इशान आणि संजू यांना फलंदाज म्हणून अंतिम अकरामध्ये घ्यावे असेही त्याने सुचविले आहे.
पंत इंग्लंड दौऱ्यावर असल्याने कार्तिक, इशान आणि संजू यांच्याकडे महत्वाची भुमिका पार पाडण्याची संधी आहे. कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उत्तम फलंदाजी करत फिनीशरची भुमिका पार पाडली होती. याच मालिकेत इशानने सलामीला येत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. या दोघांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची आयर्लंड विरुद्धच्या दौऱ्यात संघात जागा कायम झाली. संजूने आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. त्याच्या कर्णधारपदाखाली राजस्थान १४ वर्षांनंतर अंतिम सामन्यात पोहचला होता.
गावसकरने सूर्यकुमार यादवलाही संघात संधी द्यावी असे मत व्यक्त केले आहे. तो एक धडाकेबाज फलंदाज असून संघासाठी अधिक धावा जोडण्याची त्याच्यात क्षमता आहे. “उमरान मालिककडे वेग असून त्याने आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामात जलद गतीने गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या आहेत. यामुळे तो एक मह्त्वपूर्ण गोलंदाज आहे,” असे गावसकरने म्हटले आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयर्लंड विरुद्ध भारत: पहिल्या टी२० सामन्यात पावसाचा व्यत्यय? वाचा हवामान आणि खेळपट्टी काय म्हणते ते
धोनी आणि केएल राहुलवर स्मृती मंधाना पडली भारी, टी२० क्रिकेटमध्ये पार केला मैलाचा दगड
‘मी इथे कोणाला काही दाखवायला आलो नाही’, कर्णधार हार्दिक पंड्याचे टिकाकारांना कडवे प्रत्युत्तर