कोलकता। बुधवारी पार पडलेल्या आयपीएल 2018 च्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्यवर २५ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात कोलकताचा कर्णधार दिनेश कार्तिकने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने टी20 मध्ये एक महत्त्वाचा टप्पाही पार केला.
कार्तिकने टी20 क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो केवळ आठवाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तर एकूण 39 वा खेळाडू ठरला आहे. कार्तिकच्या नावावर आता 248 सामन्यात 27.26 च्या सरासरीने 5016 धावा जमा झाल्या आहेत.
यात त्याच्या 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यात एकूण 496 चौकार आणि 144 षटकार मारलेे आहेत.
या सामन्याआधी कार्तिकला टी20 मध्ये 5000 धावा करण्यासाठी फक्त 36 धावांची गरज होती. टी20 मध्ये 5000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या भारतीय खेळाडूंंमध्ये सुरेश रैना,विराट कोहली, एमएस धोनी, गौतम गंभीर,रोहित शर्मा, शिखर धवन, रॉबीन उथप्पा हे खेळाडू आहेत.
कार्तिक यावर्षी आयपीएलमध्येही चांगला खेळत आहे. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये 15 सामन्यात 54.44 च्या सरासरीने 490 धावा केल्या आहेत. तसेच तो आयपीएल 2018 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आठव्या स्थानी आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू:
7791 धावा – सुरेश रैना
7625 धावा – विराट कोहली
7316 धावा – रोहित शर्मा
6402 धावा – गौतम गंभीर
6032 धावा – एमएस धोनी
5922 धावा – शिखर धवन
5893 धावा – रॉबीन उथप्पा
5016 धावा – दिनेश कार्तिक
महत्त्वाच्या बातम्या-
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!
–विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!