---Advertisement---

2 वर्षांपूर्वी जेव्हा भारत इंग्लंडकडून हरला, दिनेश कार्तिकने सांगितली पराभावनंतरची कटू व्यथा

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 मध्ये सेमीफायनल मध्ये इंग्लंडने भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने एकही विकेट न गमावता अवघ्या 16 षटकांत लक्ष्य गाठले. भारतीय खेळाडूंशिवाय चाहतेही कमालीचे निराश झाले. मात्र, टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि इंग्लंड पुन्हा आमनेसामने आले, पण यावेळी टीम इंडियाने इंग्लंडला सामन्यात एकही संधी दिली नाही. भारताने इंग्लंडला 68 धावांच्या मोठ्या फरकाने हरवून दोन वर्षांचा बदला घेतला.

त्याआधी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला तो क्षण आठवला जेव्हा भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितले ड्रेसिंग रुमची काय अवस्था होती. तो क्षण आठवून दिनेश कार्तिक सांगतो की, 2 वर्षांपूर्वी सेमीफायनलमध्ये हाच संघ भारताविरुद्ध होता, मला आठवतं की आम्ही सगळे कसे ड्रेसिंग रुममध्ये होतो. आम्ही खूप दु:खी आणि निराश होतो कारण आम्ही सामना वाईट पद्धतीने हरलो होतो.

दिनेश कार्तिक पुढे म्हणला की, त्या पराभवानंतर आज भारतीय खेळाडूंनी ज्या प्रकारे उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केले आहे ते पाहून खूप आनंद होतो आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट कर्णधारपदाचे प्रदर्शन केले. याशिवाय राहुल द्रविडचे कोचिंग असामान्य होते. त्यामुळे या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

महत्तवाच्या बातम्या-

रनमशीन मानधना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्म्रीती मानधनाचं शानदार शतक
IND vs SA फायनलमध्ये पावसाचा धोका, राखीव दिवसही वाहून गेला तर ट्रॉफी कोणाची? जाणून घ्या संपूर्ण गणित
टीम इंडिया फायनलसाठी बार्बाडोसला पोहोचली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रंगणार अंतिम सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---