---Advertisement---

“त्याने भारतासाठी विराटसारखी कामगिरी करावी”; कार्तिकने या खेळाडूवर दाखवला विश्वास

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 1:48 PM
Virat Kohli trolled
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, त्याचवेळी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला श्रेयस अय्यर उत्कृष्ट खेळ करताना दिसतोय. त्याच्या याच दमदार कामगिरीनंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने अय्यरचे कौतुक केले आहे.

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला एका गड्याने पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात श्रेयसने 24 धावांची खेळी केलेली. तर, दुसऱ्या सामन्यातही त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला. त्याने 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यातही भारत केवळ पाच धावांनी पराभूत झाला. श्रेयस मागील काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे त्याने यावर्षी 60 पेक्षा जास्तच्या सरासरीने 721 धावा काढल्या आहेत. तसेच तो यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाजही आहे. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दिनेश कार्तिक याने त्याची तुलना थेट भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याशी केली.

बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या सामन्यानंतर बोलताना कार्तिक म्हणाला,

“तुम्ही त्याचा खेळ पाहू शकता. त्याने एक शानदार खेळी केली. यावर्षी त्याने 700 पेक्षा जास्त धावा केल्या असून, यातून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो. तो परिस्थिती पारखून खेळताना दिसतोय.”

कार्तिक पुढे म्हणाला,

“पूर्वी त्याला आखूड टप्प्याच्या चेंडूंचा त्रास व्हायचा. आता त्याने त्यावरही मात केली आहे. तो जबाबदारीने खेळताना दिसतो. त्याने 82 धावांची खेळी केली.‌ मात्र, तुम्हाला विरोधी संघांवर धाक बसवायचा असेल तर, अशी खेळी आणखी मोठी करायला हवी. विराट कोहली मागील अनेक वर्षांपासून हे करत आहे. श्रेयसने देखील अखेरपर्यंत मैदानावर उभे राहत संघाला विजय मिळवून द्यायला हवेत.”

भारतीय संघ मालिकेतील आपला अखेरचा सामना 10 डिसेंबर रोजी खेळेल. त्यानंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल.

(Dinesh Karthik said Shreyas Iyer will become next Virat Kohli)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघात मोठे बदल; रोहितची घरवापसी तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार
बाबो केवढा तो कॉन्फिडन्स! ‘मी न खेळता डाव घोषीत करेल’, बेन स्टोक्सचे खळबळजनक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---