भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज मानले जातात. दोघांनी आपापल्या संघाचे नेतृत्व देखील केले असून, फलंदाजीतील अनेक विक्रम या दोघांच्या नावे आहेत. यासोबतच या दोघांमधील मैत्री देखील चांगली असल्याचे अनेकदा दिसून येते. आता याबाबतच भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने एक मोठा खुलासा केला आहे.
विराट व स्मिथ यांच्यातील मैत्री अनेकदा मैदानावर दिसून येते. आता याच मैत्रीबाबत बोलताना कार्तिक याने एका क्रिकेट संकेतस्थळाशी म्हटले,
“ते दोघे एकमेकांचा खूप आदर करतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या वेळी मी स्मिथ याच्याशी बोलत होतो. त्यावेळी बोलताना मला स्मिथ याने सांगितले की, तो बराच काळ विराटच्या बॅटने खेळत होता. ज्या विराटने त्याला भेट म्हणून दिलेल्या. आता ऍशेससाठीही मी त्याच्याकडून आणखी बॅट येण्याची वाट पाहत आहे. अशा प्रकारची मैत्री या दोघांमधील दिसून येते.”
फलंदाजीतील अनेक विक्रम एकमेकांच्या नावावर असलेले विराट व स्मिथ हे एकमेकांबाबत अत्यंत आदराने वागत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. 2019 वनडे विश्वचषकात प्रेक्षक स्मिथ याला हुटिंग करत असताना विराटने चाहत्यांना त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्याची सूचना केली. तर, काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना विराटने स्मिथ हा आमच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे खुल्या दिलाने कबूल केले होते. तसेच स्मिथ हा देखील विराटचे नेहमीच कौतुक करताना दिसून आलेला आहे.
(Dinesh Karthik Said Steve Smith Use Virat Kohli Bat)
हेही वाचा-
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी