भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट नेहमीच चर्चेचे केंद्र राहिले आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने विशेषत: वेगवान गोलंदाजांबाबत अत्यंत सावधगिरी वृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहला न खेळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने बुमराहला टीम इंडियाचा ‘कोहिनूर’ म्हणत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.
क्रिकबझच्या शोमध्ये चर्चा करताना माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने जसप्रीत बुमाराहचे जोरदार काैतुक केला आहे. त्यानंतर तो पुढे सांगितला की, बुमराहच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कार्तिक म्हणाला, “बुमराह खूप शांत राहतो आणि आता परिपक्व झाला आहे. तो एक वेगवान गोलंदाज आहे आणि आम्ही त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कसे खेळवू शकतो? हा निवडकर्त्यांसमोर सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न असेल. बुमराहसारखा महान गोलंदाच्या फिटनेसची काळजी घ्या आपण त्याला महत्त्वाच्या सामन्यांसाठी खेळावायला हवे.
पुढे बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी कोहिनूर हिऱ्यासारखा आहे. तो म्हणाला, “आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तो दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकेल. कारण जेव्हा तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळतो तेव्हा त्याच्याकडे एक वेगळा करिश्मा असतो आणि त्याचीच आपल्याला गरज असते. त्याला कर्णधार बनवल्याने त्याच्यावरील दबाव वाढू शकतो. आणि जर आपण त्याला अनेक मालिकांमध्ये खेळायला पाठवले तर त्याला दुखापत होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास टीम इंडिया मोठ्या संकटात सापडेल.
जसप्रीत बुमराहची 2024 सालातील कामगिरी पाहिली तर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. पण त्याने 8 टी20 सामन्यात 15 विकेट घेत खळबळ उडवून दिली. या सर्व विकेट टी20 विश्वचषकात आल्या. याशिवाय त्याने वर्षभरात पाच कसोटी सामने खेळून 27 विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो गोलंदाज आहे.
हेही वाचा-
जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत
जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयची चिंता वाढणार; जाणून घ्या मोठं कारण
शिखर धवनला ‘गब्बर’ नाव कसं मिळालं? टोपण नावामागची रंजक कहानी जाणून घ्या