इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. बेन स्टोक्सच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारतीय संघाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये देखील दिसणार नाही. बेन स्टोक्सने आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि डाव्या हाताच्या तर्जनीला विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
त्याच्या या निर्णयाबद्दल क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने देखील स्टोक्सच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर कार्तिक म्हणाला की, त्याला या बदलाची अपेक्षा नव्हती. त्याने ट्विट केले आहे की त्याचा जवळचा मित्र आणि क्रिकेटपटू अभिनव मुकंदने मानसिक आरोग्याबद्दलही चर्चा केली आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने देखील खेळाडूंच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीबद्दल उघडपणे बोलण्याची गरज असल्याचे सांगितले. भारतीय यष्टीरक्षक कार्तिक म्हणाला की, बायो बबलमध्ये राहणे बाहेरून दिसते तितके सोपे नाही.
Omg,didn't see that coming.I remember my best friend @mukundabhinav speak about it. Recently @imVkohli spoke about this being something very real in covid times
Quarantining and bubble life isn't easy . I promise you. Looks easy because of the luxury , but the battle is within https://t.co/e3JxGlQ1vE
— DK (@DineshKarthik) July 30, 2021
जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला स्टोक्सच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडला ४ ऑगस्टपासून भारताविरुद्ध पाच कसोटींची मालिका खेळायची आहे. या मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला म्हणजेच २०२१-२३ या पर्वाला सुरुवात होणार आहे. त्याआधी स्टोक्सची माघार हा इंग्लंड संघासाठी मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२१ दरम्यान स्टोक्सचे बोट फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर बोटाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. ईसीबीने स्टोक्सच्या माघारीबद्दल एक निवेदन सादर केले की की, ते स्टोक्सच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करत असून खेळापासून दूर राहण्याच्या कालावधीत त्याला बोर्ड मदत करत राहील.
बेन स्टोक्सने शेवटचा कसोटी सामना भारतीय संघाविरुद्ध मार्च २०२१ मध्ये खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीकाकारांना उत्तर देण्याची मोठी संधी सॅमसनने गमावली, माजी भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली निराशा
रिषभ पंतने ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीशी संबंधीत खास घटनेचा केला खुलासा, म्हणाला…
भारताचे असे ४ स्टार क्रिकेटर जे लवकरच घेऊ शकतात टी२० क्रिकेटमधून निवृत्ती