भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची विकेट घेणे सगळ्याच गोलंदाजांच्या कारकिर्दीतील महत्वाचा क्षण असतो, मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लाम याचे वेगळे मत आहे. या डाव्या हाताच्या गोलंदाजाने विराटला केवळ एका धावेवर पायचीत केले. तैजुलसाठी भारताच्या माजी कर्णधाराची विकेट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण नव्हता , असे विधान त्याने केले आहे. त्याचबरोबर त्याने कोणाची विकेट अप्रतिम होती हे पण स्पष्ट केले आहे.
बांगलादेश आणि भारत (BANvIND) यांच्यात दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात तैजुल इस्लाम (Taijul Islam) याने भारताच्या महत्वपूर्ण फलंदाजांचा बाद करत संघाला अडचणीत आणले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याबरोबर गिल, पुजारा आणि कुलदीप यादव यांना बाद केले. त्याच्यासाठी विराट नाहीतर पुजाराची विकेट महत्वाची ठरली, असे त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
“विराटची विकेट मी याआधीही काढली आहे, त्यामुळे कारकिर्दित त्याचे तेवढे महत्व नाही. कोहलीला जो चेंडू टाकला त्याची लाईन आणि लेंथ अचूक होती यामुळे तो बाद झाला, मात्र पुजाराला टाकलेला चेंडू अप्रतिम होता. त्याला वाटले तो सरळ जाईल मात्र तो स्टम्पला लागला. कोहलीच्या तुलनेत पुजाराची विकेट अधिक चांगली होती”, असे तैजुलने म्हटले आहे.
तैजुलच्या या विधानाने मात्र काही चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी ट्वीटरवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/Siddhar70172885/status/1603086354669539328?s=20&t=GUx40KcN6eHdKutZgzF3yw
https://twitter.com/drsureshiyer/status/1603211009493114880?s=20&t=UA3Pdwf26zwEP2tdjLIS_w
या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्व विकेट्स गमावत 404 धावसंख्या उभारली. यामध्ये चेतेश्वर पुजाराने 90, श्रेयस अय्यरने 86 आणि आर अश्विन यानेही 58 धावा केल्या. रिषभ पंतने 46 आणि कुलदीप यादव याने 40 धावा केल्या.
बांगलादेशकडून तैजुल याच्याबरोबरच मेहेदी हसन हा देखील प्रभावी ठरला. त्याने पंत, अक्षर, अश्विन आणि सिराज यांना बाद केले. Dismissing Virat Kohli not my career highlight said Taijul Islam
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पैसे नसले तरीही चालतंय! भारत-पाकिस्तान सामन्याविषयी रिझवानचा मोठा खुलासा
पुजारा, अय्यर-अश्विनच्या धमाकेदार खेळीने भारताचा पहिला डाव 400च्या पार; उमेश यादवची झटपट खेळी






