पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय या स्पर्धेचे यजमानपद भुषवणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय आतापासूनच तयारीला लागली आहे. पण याविषयी एक मोठी माहिती सध्या समोर येत आहे. भारतात स्पर्धा आयोजित केली, तर आयसीसीला कराची मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
भारत सकराककडून (Government of India) विश्वचषकासाठी आयसीसीवर लावला जाणारा खूपच जास्त आणि यामध्ये सवलत द्यावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. बीसीसीआयने सरकारकडे मागणी करून ही सवलत मिळवून द्यावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. मात्र, आयसीसीला करात सवलत मिळेल, याची शक्यता खूपच कमी आहे. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर विश्वचषकाचे यजमानपद देखील बीसीसीआयच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कराच्या या वादामुळे आयसीसी (ICC) आणि बीसीसीआय (BCCI) मागच्या काही काळापासून आमने सामने आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारताला तेव्हाच मिळेल, जेव्हा बीसीसीआय आयसीसीला भारत सरकारकडून करात सवलत मिळवून देईल. असे असले तरी, भारत सरकारकडून या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता खूपच कमी आहे. यापूर्वी 2016 मध्येही याच कारणावरून बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये वातावरण तापले होते.
2016 मध्ये भारतात आयसीसी टी-20 विश्वचषक आयोजित केला गेला होता. बीसीसीआय या विश्वचषक स्पर्धेत यजमानाच्या भूमिकेत होते आणि तेव्हा देखील सकारकडून आयसीसीला कर सवलत मिळवून देऊ शकले नव्हते. या विश्वचषक स्पर्धेसाठी सरकारला 200 कोटींचा कर मिळणार होता, जो त्यांनी वसूल देखील केला. परिणामी हे नुकसान बीसीसीआयला सोसावे लागेल आणि त्यांनी आयसीसीला त्यांच्या वाट्याचे 190 कोटी रुपये परत केले.
आयसीसी स्पर्धा आयोजित करणाऱ्या देशाला त्यांच्या सरकारसोबत समन्वय साधून करात सवलत मिळवायची असते. मात्र, भारत सरकार असल्या कुठल्याच कारणास्तव कर सवलत देत नाही. अशात बीसीसीआयला तरीही वनेड विश्वचषकात भारतात खेळवायचाच असेल, तर त्यांना आयसीसीला त्यांच्या वाटाचे 900 कोटी रुपये द्यावे लागतील. विश्वचषक पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला गेला असून, याविषयी येत्या काळात काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे असेल. (Dispute with ICC will cost India dearly! 900 crores to be paid for hosting the World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात
पहिल्या कसोटी शतकाला शुबमन गिलने म्हटले खास, मात्र एका गोष्टीमुळे ‘नाराज’