कोविड-१९ महामारीनंतर संपूर्ण जग पुन्हा एकदा नव्याने पूर्ववत होत आहे. जगातील जवळपास सर्वच देशांनी कोविड-१९ वेळी लादलेली नियमावली शिथिल केली असून, लोकांना आता इतर देशात प्रवास करणे काहीसे सुकर झाले आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाने मात्र या निर्बंधात कसलीही सूट दिली नसून, याचा परिणाम खेळाडूंवर होत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या या धोरणामुळे आता क्रिकेट पाठोपाठ टेनिस खेळाडूंमध्ये देखील नाराजी पसरल्याचे सांगण्यात येतेय.
विक्टोरिया सरकारचा आदेश
ऑस्ट्रेलियातील प्रमुख राज्य असलेल्या विक्टोरिया सरकारने काढलेल्या आदेशानुसार, या राज्यात येण्यासाठी विदेशी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे. तसेच, राज्यात प्रवेश केल्यानंतर येथिल सक्त क्वारंटाईन नियम पाळणे अनिवार्य आहे.
ऍशेस मालिकेवर संकटाचे ढग
विक्टोरिया सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेटमधील सर्वात मोठी कसोटी मालिका अशी ख्याती असलेली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेवर धोक्याचे ढग जमा झाले आहेत. इंग्लंडच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी या निर्णयाला विरोध केला आहे. इंग्लंडचे काही प्रमुख खेळाडू हे कडक निर्बंध लादले गेल्यास ऍशेस मालिकेत सहभागी होणार नसल्याचे म्हटलेले. ऍशेस मालिका ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनबाबतही संदिग्धता
टेनिसमधील चार ग्रॅंडस्लॅमपैकी असलेली पहिली ग्रॅंडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन देखील या निर्णयामुळे बाधित होऊ शकते. कारण, हे निर्बंध जानेवारीपर्यंत लावले जाणार आहेत. जगातील क्रमांक एकचा टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच याने यापूर्वीच या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तो मागील काही दिवसांपासून सक्तीच्या लसीकरणा विरोधाात लढत आहे. ब्रिटनची महिला टेनिसपटू कोंटा हिने देखील याा कडक नियमांविषयीी नाराजी केलेली. ऑस्ट्रेलियन ओपन पुढील वर्षी जानेवाारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल.