---Advertisement---

INDvNZ: टीम इंडिया, सिनेमातील पोलीसांप्रमाणे काम करा; दिग्गजाच्या छुप्या संदेशाचा अर्थ काय?

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर मागील काही काळापासून सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय झाला आहे. तो क्रिकेटजगतात घडणाऱ्या अनेक लहान-मोठ्या गोष्टींवर ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतो. या दरम्यान त्याची शैली ही अत्यंत विनोदी आणि उपहासात्मक असलेली दिसून येते. आता जाफरने युट्युबवर देखील पदार्पण केले असून, आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तो भारतीय संघाला छुप्या पद्धतीने संदेश देताना आढळून आला.

तुम्हाला पोलिसांप्रमाणे कार्य करायचे आहे
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व त्यानंतर इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असा मोठा दौरा करण्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये कसे यशस्वी व्हायचे? याबाबतचा एक मजेशीर कानमंत्र वसीम जाफरने आपल्या नव्या युट्युब चॅनेलमध्ये भारतीय संघाला दिला.

तो म्हणाला, “मी दोन वेळा खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यावर गेलो आहे. तेथे यशस्वी होण्यासाठी माझा भारतीय फलंदाजांना एक छुपा संदेश आहे. तुम्हाला बॉलीवूड चित्रपटांमध्ये पोलीस करतात तसे काम इंग्लंडमध्ये करावे लागेल. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तुम्हाला अशीच फलंदाजी करायची आहे.”

जाफरचे म्हणणे असे आहे की, ज्याप्रकारे बॉलीवूड चित्रपटांमध्ये गुन्हा घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होतात. त्याप्रमाणे, भारतीय फलंदाजांनी अगदी वाट पाहून प्रत्येक चेंडू खेळावा.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत पार पडेल. या सामन्यात दाखल होण्यापूर्वी न्यूझीलंडने नुकताच यजमान इंग्लंडचा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पराभव केला आहे. तर, भारतीय संघ या दौऱ्यावर एकही सराव सामना खेळू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘विराट’ फटका! गोलंदाजाच्या चेंडूवर कोहलीचा गगनचुंबी षटकार, सर्व खेळाडू पाहतचं राहिले

श्रीलंकाविरुद्धची फ्लॉप कामगिरी, ‘या’ खेळाडूंच्या टी२० विश्वचषकाच्या स्वप्नावर फेरेल पाणी!

ठरलं तर! ‘हाच’ दिग्गज श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा महागुरु, गांगुलीचा शिक्कामोर्तब

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---